ठळक बातम्या

‘हे’ आहे देशातील सर्वात उंच कुटुंब; शूज मागवावे लागतात परदेशातून

गर्दीत एखादा उंच माणूस दिसला, तर आजूबाजूला चालणाºयांची नजर आपोआपच तिकडे वळली जाते. भारतात उंच लोकांची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी केली जाते, पण जरा त्या कुटुंबाचा विचार करा ज्यांच्या घरात प्रत्येकजणच उंच आहे. त्यांची ही उंची आकर्षणाचा विषय असला, तरी त्यांच्या उंचीमुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अनेक समस्यांना सामोरेही जावे लागते. यामध्ये कपड्यांच्या फिटिंगपासून पादत्राणांपर्यंतच्या आकाराचा समावेश आहे.
आम्ही बोलत आहोत महाराष्ट्रातील पुण्यातील अनोख्या कुटुंबाबद्दल. कुलकर्णी कुटुंबातील प्रत्येक सदस्य उंच आहे. या कुटुंबातील सर्वात लहान सदस्याची उंची ६ फूट १ इंच आहे. त्याच वेळी, कुटुंबातील सर्वात उंच सदस्याची उंची ७ फूट आहे. शरद कुलकर्णी हे या कुटुंबाचे प्रमुख आहेत. शरद यांच्या पत्नीची उंची ६ फूट ३ इंच आहे. मुलगी मुरुगाची उंची ६ फूट १ इंच आहे, तर दुसºया मुलीची उंची ६ फूट ४ इंच आहे. या कुटुंबातील सर्व सदस्यांची उंची जोडली, तर ती २६ फूट आहे.

त्यांच्या उंचीमुळे या कुटुंबाचा लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी या कुटुंबात पती-पत्नीने एक विक्रम केला होता. त्यांना १९८९ मध्ये जगातील सर्वात उंच जोडीचा किताब देण्यात आला होता, पण जेव्हा त्यांच्या मुली मोठ्या झाल्या, तेव्हा त्यांची उंचीही त्यांच्या पालकांसारखीच झाली. त्यांच्या उंचीमुळे या कुटुंबालाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे कुटुंब सार्वजनिक वाहतूक कधीच वापरत नाहीत. त्यांना चालणे अधिक सोयीचे असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेकदा हे कुटुंब रस्त्यावरून चालताना दिसते. याशिवाय ते त्यांची कस्टमाइज स्कूटी वापरतात.
त्यांच्या उंचीमुळे कुटुंबाला आणखी एका समस्येला सामोरे जावे लागते. ते म्हणजे त्यांचे कपडे आणि पादत्राणे यांची निवड. कुटुंबातील सदस्यांच्या पायाचा आकार एवढा मोठा आहे की, यासाठी त्यांना परदेशातून चप्पल आणि बूट आणावे लागतात. सोशल मीडियावर फॅमिली फोटो व्हायरल होत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment