‘हे’ आहे जगातील पहिले झपाटलेले रेस्टॉरंट

तुम्ही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाता, तेव्हा रेस्टॉरंटचे कर्मचारी अतिशय व्यवस्थित आणि स्वच्छ पोशाख घालून तुमचे स्वागत करतात आणि तुम्हाला छान जेऊ घालतात; पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका रेस्टॉरंटबद्दल सांगणार आहोत. येथे भूतं लोकांचे स्वागत करण्यासाठी येतात आणि त्यांना भोजनही देतात. हे पाहून कुणालाही नक्कीच भीती वाटेल. खरं तर, आम्ही स्पेनमधील ‘ला मासिया एन्कांटाडा’ नावाच्या रेस्टॉरंटबद्दल बोलत आहोत. या रेस्टॉरंटची संकल्पना कदाचित जगातील सर्वात अनोखी आहे आणि ती त्याच्या इतिहासापासून प्रेरित आहे. खरंतर इथे भूतं नसतात, पण रेस्टॉरंटचे कर्मचारी लोकांना भूत म्हणून जेवण देतात. एवढेच नाही तर येथे येणाºया ग्राहकांचे रक्ताने माखलेल्या चाकूने स्वागत केले जाते.
खरंतर, १७व्या शतकात जोसेफ मा रियास यांनी मासिया आणि सुरोका यांनी ‘मासिया सांता रोसा’ नावाची इमारत बांधली; मात्र नंतर या इमारतीवरून कौटुंबिक वाद निर्माण झाला. एके दिवशी सुरोका आणि रीस यांनी पत्ते फेकून त्यांचे भवितव्य ठरवले. रीसने सर्व मालमत्ता गमावली. त्याच्या कुटुंबाने घर सोडले आणि कुटुंबाने नवीन मालमत्ता निर्माण केली. लवकरच, मासिया सांता रोजा अवशेषांमध्ये बदलले.

असे म्हटले जाते की, ही इमारत दोन शतके निर्जन होती आणि त्यानंतर सुरोकाच्या वंशजांनी १९७०मध्ये या इमारतीत एक रेस्टॉरंट बांधले. या वास्तुला शाप मिळाला आहे, असे त्यांच्या कुटुंबीयांचे मत होते, त्यामुळे ते रेस्टॉरंट हांटेड रेस्टॉरंट म्हणून का चालवू नये, असा विचार त्यांना आला. तेव्हापासून हे रेस्टॉरंट झपाटलेले रेस्टॉरंट म्हणून सुरू आहे. येथे वेटर भुताटकीच्या परिसरात जेवण देतात आणि जेवणाच्या वेळा ठरलेल्या असतात. या रेस्टॉरंटमध्ये ६० जागा आहेत आणि जेवण घेण्यासाठी तुम्हाला आगाऊ बुकिंग करावे लागते. जेव्हा ग्राहक ठरलेल्या वेळेवर येतात, तेव्हा त्यांचे रक्ताने माखलेले चाकू, तलवार किंवा विळा देऊन स्वागत केले जाते. तुम्ही पुढे गेल्यावर तुम्हाला लटकलेले पंजे किंवा बनावट प्रेत सापडतील जे दिसायला अगदी खरे वाटतात.
इतकंच नाही तर जेवण खाताना ग्राहकांसाठी एक शो आयोजित केला जातो, जो प्रत्येकाला बघता येत नाही. यामध्ये विविध प्रकारच्या भूतांच्या वेषात लोक तुमचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात, तसेच काही तरी वेगळे सर्व्ह करतात, जे पाहून कोणीही किंचाळू शकते. या रेस्टॉरंटची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हॉरर शोमध्ये ग्राहक केवळ मूक प्रेक्षक म्हणून बसू शकत नाहीत.

या अनोख्या रेस्टॉरंटमध्ये मोबाइल नेण्यास मनाई आहे, तसेच रेस्टॉरंटमध्ये कॅमेरा, डिजीकॅम, व्हिडीओ कॅमेरे आदींना बंदी आहे. जर कोणाला भूत खूप आवडत असेल किंवा बघायला आवडत असेल, तर ते या रेस्टॉरंटमध्ये येऊन जेवण करू शकतात.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …