ठळक बातम्या

हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन

नवी दिल्ली – तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन झाले आहे. दुर्घटनेत जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर बंगळुरू येथील कमांड रुग्णालयात उपचार सुरू होते. दुर्घटनेत बिपीन रावत यांच्यासह इतर १३ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर वेलिंग्टन येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, १६८ तासांची झुंज अपयशी ठरली. ते लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना केली जात होती. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान बधुवारी त्यांचे निधन झाले.
तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. या दुर्घटनेत वरुण सिंह गंभीर जखमी झाले होते. ते जवळपास ४५ टक्के
होरपळले होते. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. ज्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे सीडीएस बिपीन रावत व्याख्यानासाठी गेले होते, त्याच सुलूर हवाई तळावर वरुण सिंह विंग कमांडर होते.
एक वर्षापूर्वी वरुण सिंह उड्डाण करत असलेल्या एका लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या सिस्टीममध्ये बिघाड झाला होता, परिणामी त्यांनी एअरक्राफ्टवरील नियंत्रण पूर्णपणे गमावले होते. मात्र, मोठ्या हिमतीने त्यांनी विमान उतरवण्यात यश मिळवले होते. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शौर्यचक्र प्रदान करण्यात आले होते.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …