ठळक बातम्या

हेरॉईन जप्तीच्या प्रमाणात चार वर्षांत प्रचंड वाढ!

भारताचा उपयोग ट्रांझिट पॉइंटच्या रूपात केला जात असल्याचीही माहिती समोर
नवी दिल्ली- हेरॉईन जप्तीच्या प्रमाणात मागील चार वर्षांमध्ये तब्बल ३७ हजार टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. अधिकाºयांचे म्हणणे आहे की, भारताचा उपयोग ट्रांझिट पॉइंटच्या रूपात केला जात आहे. २०१८ मध्ये ८ किलोग्रॅमपासून ते २०२१ मध्ये ३ हजार किलोग्रॅमपेक्षाही जास्त अशी भारताने चार वर्षांमध्ये हेरॉईन जप्तीमध्ये आतापर्यंतची सर्वात जलद वाढ नोंदवली आहे. डीआरआय आणि एनसीबीच्या अधिकाºयांनी म्हटले की, देश अमली पदार्थांच्या व्यापारासाठी ट्रांझिट पॉइंट म्हणून उदयास येत आहे.
महसूल गुप्तचर संचालनालय ही तस्करीविरोधी प्रकरणांवरील देशातील सर्वोच्च गुप्तचर आणि अंमलबजावणी संस्था आहे, तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे अमली पदार्थांची तस्करी आणि नार्कोटिक्स ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिकअंतर्गत अवैध पदार्थांचा वापर रोखण्याचे काम आहे.
दोन एजन्सींमधील अधिकाºयांनी सांगितले की, राज्यस्तरीय एजन्सींनी अनेक प्रवासी निर्बंध असूनही कोविड-१९ साथीच्या आजारादरम्यान हेरॉइन जप्तीमध्ये मोठी वाढ नोंदवली आहे. गेल्या चार वर्षांत हेरॉईनच्या तस्करीत धक्कादायक वाढ झाली आहे. भारत हा तस्करांसाठी ट्रांझिट पॉइंट म्हणून उदयास येत आहे, परंतु एजन्सींनी सर्व बंदरांवर तपासणी वाढवली आहे, जे आजकाल तस्करांसाठी सर्वात पसंतीचे मार्ग आहे, अशी माहिती दक्षिण भारतातील बंदर हाताळण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
अफगाणिस्तानात अफूच्या पिकाच्या लागवडीत वाढ हे या मोठ्या वाढीमागचे एक कारण असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे. युनायटेड नेशन्स आॅफिस आॅन ड्रग्ज अँड क्राइमच्या अहवालानुसार, अफगाणिस्तानमध्ये अफूच्या बेकायदेशीर लागवडीसाठी वापरल्या जाणाºया जमिनीच्या क्षेत्रात ३७ टक्के वाढ नोंदवली गेली आहे, ज्याचा ताबा या वर्षी आॅगस्टमध्ये तालिबानने घेतला होता. डीआरआयने संकलित केलेला डेटा सांगतो की, २०१८-१९ मध्ये एजन्सीने ७.९८ किलो हेरॉईन जप्त केले, जे पुढच्या वर्षी २५ टक्क्यांनी वाढले, जेव्हा एजन्सीने ९.१६ किलो जप्त केले. गेल्या वर्षी देशभरात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला, तेव्हा जप्तींमध्ये २ हजार टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आणि सुमारे २०२ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. सुरुवातीच्या धक्क्यानंतरही, यावर्षी सप्टेंबरमध्ये गुजरातच्या मुंद्रा बंदरात पकडण्यात आलेल्या २१ हजार कोटी रुपयांच्या ३ हजार किलो हेरॉईनच्या खेपेच्या तुलनेत जप्ती कमी झाली.
डीआरआयच्या डेटानुसार, २०१८ ते २०२१ पर्यंत, एजन्सीने जवळपास ३७ हजार ४०० टक्के जप्ती वाढवल्या आहेत. या आकडेवारीत डीआरआयद्वारे जप्त केलेल्या इतर जप्ती आणि यावर्षी जूनमध्ये एजन्सीकडून सुटलेली एक खेप वगळण्यात आली आहे, ज्यामध्ये जवळपास सहा हजार किलो हेरॉईन असल्याचा संशय होता. सप्टेंबरमधील जप्ती आणि जूनमध्ये सुटलेली जप्ती दोन्ही कथितरित्या एकाच आंतरराष्ट्रीय तस्करीच्या रॅकेटचा भाग आहेत. दोन्हींचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडून सुरू आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …