‘हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते’

  •  गुलाबराव पाटलांना विधान भोवणार?
  • रुपाली चाकणकरांचा इशारा, दरेकरांकडूनही निषेध

जळगाव – नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत जळगावमध्ये शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. जळगावमध्ये आयोजित जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना रस्त्यांची तुलना थेट ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालांशी केली. गुलाबरावांच्या या विधानानंतर राज्याचे राजकारण तापले आहे. राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.

गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. गुलाबराव पाटील यांनी जळगावात एका प्रचारसभेत आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यावर खडसे यांनीही पाटील यांना प्रत्युत्तर देताना मतदारसंघात काम केले म्हणूनच ४० वर्ष निवडून येतोय असे म्हटलेले. दुसरीकडे, गुलाबराव पाटील यांच्या विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करत प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी करणारे एक ट्विट केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्री हेमा मालिनी हिचे गाल आणि रस्ते यांची तुलना केली आहे. हे खरोखरच चुकीचे विधान आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाईचे आदेश देतील की नाही हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री नेहमीच त्यांच्या नेत्यांना पाठिशी घालण्याचे काम करतात, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आपापसांत विसंवाद सुरू आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भविष्यात नक्कीच भाजपला पसंती देईल, असेही दरेकर म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …