हॅरी पॉटर रियुनियन : रिटर्न टू हॉगवर्ट्सचा ट्रेलर रिलीज

एका जमान्यात तुफान लोकप्रियता मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या हॅरी पॉटर चित्रपटाची जादू आता पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. हॅरी पॉटर : रिटर्न टू हॉगवर्ट्सचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलर पाहून या चित्रपटाच्या सर्व जुन्या आठवणी ताज्या होतात. ट्रेलरमध्ये चित्रपटाशी निगडीत सर्व कलाकार आपले अनुभव शेअर करताना दिसून येतात. नुकत्याच रिलीज झालेल्या या ट्रेलरमध्ये हॅरी पॉटरची मुख्य भूमिका साकारणारा डॅनिअल रेडक्लिफ एका निर्जन गल्लीत चालताना दिसून येतो. पुढे जाऊन तो हर्माइनी ग्रेंजर (एम्मा वॉटसन) आणि रॉन विजली (रुपर्ट ग्रिंट) यांना भेटतो. या तिघांव्यतिरिक्त ट्रेलरमध्ये अन्य कलाकारही दिसून येतात.
हॅरी पॉटर फ्रेंचाइजीला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १ जानेवारी, २०२२ रोजी एका खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सेलिब्रेशनचे नाव हॅरी पॉटर : रिटर्न टू हॉगवर्ट्स असे ठेवण्यात आले आहे. एचबीओ मॅक्सवर रिलीज होणाऱ्या या शोमध्ये फ्रेंचाइजीशी निगडीत सर्व कलाकार दिसून येणार आहेत. रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये सर्व अभिनेत्यांचे हॉगवर्ट्सच्या ग्रेट हॉलमध्ये रियुनियन होते. येथे सर्व जण एकमेकांबरोबर बोलताना दिसून येतात. याशिवाय ट्रेलरमध्ये चित्रपटात ड्रेको मालफॉयची भूमिका साकारणाऱ्या टॉम फेल्टरची एम्मा गळाभेट घेताना दिसून येते. याशिवाय ट्रेलरमध्ये हर्माइनी असे म्हणताना दिसून येते की ‘असे वाटतेय की जसे काळ हा पुढे सरकलाच नाही, परंतु वास्तवात तो खूप पुढे निघून गेला आहे.’

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …