हुमाच्या ब्राईडल गाऊनमधील बोल्ड अंदाजावर युजर्सची नापसंती


हुमा कुरैशी ही सध्या आपली वेब सीरीज महारानीमुळे खूप चर्चेत आहे. या सीरीजमधील तिचा कमालीचा अनुभव प्रेक्षकांना खूपच भावला आहे. या सीरीजमध्ये हुमाचा एका सामान्य गृहिणी ते मुख्यमंत्रीपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. हुमा कुरैशी पडद्यावर जितक्या सोज्ज्वळ भूमिका साकारताना दिसते तितकीच बोल्ड ती आपल्या खासगी आयुष्यात आहे. या गोष्टीचा अंदाज तुम्हाला तिच्याद्वारे पोस्ट करण्यात आलेल्या सोशल मिडिया पोस्ट वरुन नक्कीच येईल. खरेतर कधी लोक तिच्या लुकला प्रचंड पसंती दर्शवतात तर कधी ती अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल होत असते.
अलिकडेच हुमाने सोशल मिडियावर अत्यंत सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिने एका वेडींग मॅगझीनकरिता फोटोशूट केले होते. त्यातीलच हे फोटो आहेत ज्यात हुमा को कट क्लीवेज गाऊनमध्ये दिसून येत आहे. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. सोशल मिडियावर तिच्याद्वारे शेअर करण्यात आलेल्या या फोटोंना काहींनी पसंती दर्शवली आहे तर काहींनी हुमाला ट्रोलही केले आहे. काहींना तिचा डीप नेक लुक बिल्कुल आवडलेला नाहीयं. एका युजरने हुमा कुरैशीचा फोटो शेअर करत लिहिले आहे,’ संपूर्ण कपडे घेण्यासाठी पैसे कमी पडतात का मॅम?’ तर अन्य युजरने लिहिले आहे,’ आजकल आपण जरा जास्त जोश मध्ये आहात मॅडम.’ तर काहींना हा फोटो खूप आवडलाही आहे. त्यापैकी एका युझरने लिहिले आहे,’ नवरा मुलगा कुठे आहे?’ तर दुसऱ्याने माशाअल्लाह म्हणत हुमाची तारीफ केली आहे. याशिवाय तिच्या अनेक बॉलीवूड फ्रेंडसनी देखील या तिच्या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.
हुमाने 2019 मध्ये वेब सीरीज लैलाद्वारे डेब्यू केले होते. महारानी ही तिची दुसरी सीरीज आहे. बॉलीवूडबरोबरच हुमाने हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाने सर्वांनाच जिंकून घेतले आहे. हुमाच्या आगामी चित्रपटांमध्ये वलीमाई हा तमिळ चित्रपट ते नेटफ्लिक्सवरील मोनिका, ओ माय डार्लिंग आदींचा समावेश आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …