ठळक बातम्या

हिरोपंती2 द्वारे नवाजने विनोद खन्ना यांना वाहिलीय श्रद्धांजली


टायगर श्रॉफ सध्या सातत्याने आपल्या चित्रपटांद्वारे लोकांचे मनोरंजन करताना दिसून येतोयं. लोकही खासकरुन त्याची ॲक्शन पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत असतात. सध्या टायगरचा जो चित्रपट चर्चेत आहे तो म्हणजे हिरोपंती 2 . या चित्रपटासाठी टायगरने प्रचंड मेहनत घेतली असून या चित्रपटात त्याच्या जोडीला तारा सुतारिया पहायला मिळणार आहे. आता अलिकडेच या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीचीही एंट्री झाली आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना नवाजने आपल्या भूमिकेचा खुलासा केला आहे. नवाजने म्हटले आहे,’ या व्यक्तीरेखेत दिग्गज अभिनेता विनोद खन्ना यांचे कनेक्शन आहे. नवाजच्या म्हणण्यानुसार त्याने या चित्रपटात विनोदजींना विश्ेष श्रद्धांजली वाहिली आहे.’ नवाज म्हणतो की या चित्रपटात त्याने हॅँडसम विनोद खन्ना यांना ट्रीब्युट दिले आहे. त्यांची चालण्याची एक वेगळीच स्टाईल होती जी अन्य कुणा अभिनेत्याला अवगत नव्हती. त्यांच्या चालण्याच्या पद्धतीत एक पुरुषी झलक होती. मी हिरोपंती 2 मध्ये त्यांच्याकडून हे चालणे उधार घेतले आहे. मला आशा आहे की विनोदजींच्या चाहत्यांना माझे काम पसंत पडेल.’

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …