ठळक बातम्या

हिरोईन नसल्याने मुंबई पोलिसांच्या कामगिरीला प्रसिद्धी मिळाली नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांविरोधात एनसीबीकडून व्यापक प्रमाणात कारवाई सुरू आहे. यामध्ये सिनेजगताशी संबंधित काही व्यक्तींवरही ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यात सुरू असलेल्या कारवायांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खोचक टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी २७ कोटी रुपयांचे हेरॉईन पकडले होते पण त्यात हिरोईनचा संबंध नसल्याने त्यांच्या कारवाईला प्रसिद्धी मिळाली नाही, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

नागपूर प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत डीएनए विभाग आणि वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आॅनलाइन पद्धतीने झाले. या प्रसंगी गृहमंत्री वळसे-पाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात अमली पदार्थविरोधी कारवाईचे पेव फुटले आहे. जणू काही संपूर्ण जगातील अमली पदार्थ केवळ महाराष्ट्रात आहेत, असे वातावरण निर्माण केले जात आहे. तसेच केंद्रातील तपास युनिटच ते शोधू शकते. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी २७ कोटी रुपयांचे हेरॉईन पकडले होते, पण त्यात हिरोईनचा संबंध नसल्याने त्यांच्या कारवाईला प्रसिद्धी मिळाली नाही. महाराष्ट्र पोलीस मजबूत आहेत आणि त्यांनी अनेक मोठ्या कामगिºया केल्या आहेत. महाराष्ट्र पोलिसांची ही ख्याती बदनाम करण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
दरम्यान, गुन्ह्याला वाचा आणि गुन्हेगाराला सजा देण्यासाठी या प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या प्रयोगशाळांमुळे गुन्ह्यांचा तपास करण्याला वेग येईल आणि पुढे होणाºया शक्ती कायद्याला बळकटी मिळेल, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

2 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *