ठळक बातम्या

हिमाचल प्रदेश विजय हजारे ट्रॉफीचे विजेता

  • धवन व अरोराची चमकदार कामगिरी

जयपूर – कर्णधार ऋषी धवनची अष्टपैलू कामगिरी व सामनावीर सलामी फलंदाज शुभम अरोराच्या नाबाद शतकीय खेळीच्या जोरावर हिमाचल प्रदेशने विजय हजारे ट्रॉफी राष्ट्रीय वनडे स्पर्धेत अंधुक प्रकाशामुळे प्रभावित फायनलमध्ये रविवारी तामिळनाडूचा विझेडी प्रणालीने ११ धावांनी पराभव केला. अशाप्रकारे हिमाचल प्रदेशने पहिल्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.
तामिळनाडूने अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या ११६ धावांच्या खेळीच्या जोरावर ३१४ धावा (४९.४ धावांत संपूर्णबाद) केल्या. अंधुक प्रकाशामुळे सामना थांबवला तेव्हा हिमाचलने ४७.३ षटकांत ४ बाद २९९ धावा केल्या होत्या. विझेडी प्रणालीने त्यावेळी तामिळनाडूची धावसंख्या २८९ धावा होती. यष्टीरक्षक फलंदाज अरोराने १३१ चेंडूंत नाबाद शतकी खेळीदरम्यान १३ चौकार व एक षटकार ठोकला, तर शानदार लयात असलेल्या धवनने २३ चेंडूंत नाबाद ४२ धावा केल्या, त्या काळात त्याने पाच चौकार व एक षटकार ठोकला. धवनने गोलंदाजीतही कमाल दाखवत १० षटकांत ६२ धावा देत तीन विकेट मिळवल्या. हिमाचल प्रदेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशात हिमाचलने एक वेळ तामिळनाडूची अवस्था १४.३ षटकांत ४ बाद ४० धावा केली होती. त्यानंतर कार्तिक व बाबा इंद्रजीतने २०२ धावांची शानदार भागीदारी करत तामिळनाडूला सामन्यात पुनरागमन करून दिले. कार्तिकने १०३ चेंडंूच्या खेळीत आठ चौकार व सात षटकार ठोकले, तर इंद्रजीतने ७१ चेंडूंच्या खेळीत आठ चौकार व एक षटकारच्या मदतीने ८० धावा केल्या. अखेरच्या षटकात शाहरूख खानने पुन्हा एकदा आक्रमक खेळी केली. त्याने २१ चेंडूंत तीन षटकार व तीन चौकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या, तर कर्णधार विजय शंकरने १५ चेंडंूत २२ धावा केल्या. हिमाचल प्रदेशसाठी पंकज जैसवालने ९.४ षटकांत ५९ धावा देत चार विकेट मिळवल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अरोरा व प्रशांत चोप्रा (२१)ने पहिल्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी करत हिमाचल प्रदेशला चांगली सुरुवात करून दिली, पण त्यांनी दिग्विजय रांगी (शून्य) व निखिल गंगटा (१८) यांच्या विकेट झटपट गमावल्या. अरोराला त्यानंतर अमित कुमारने चांगली साथ दिली. दोघांच्या चौथ्या विकेटसाठीच्या १४८ धावांच्या भागीदारीत अमितने ७४ धावांचे योगदान दिले. त्याने ७९ चेंडूंत सहा चौकार ठोकले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …