हिमाचल प्रदेशात कारखान्यातील स्फोटात सहा महिलांचा होरपळून मृत्यू


देहरादून – हिमाचल प्रदेशमधील ऊना जिल्ह्यामध्ये एका कारखान्यामध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये सहा महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर १० ते १५ महिला जखमी झाल्यात. स्फोट झाल्यानंतर तातडीने या ठिकाणी मतकार्य सुरू करण्यात आले.
ऊना येथील हरोलीमधील टाहलीवाल येथील फटाक्यांच्या कारखान्यामध्ये हा स्फोट झाला. या स्फोटामुळे कारखान्याला आग लागली आणि त्यामध्ये सहा महिला कर्मचाºयांचा होरपळून मृत्यू झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांना ऊना येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नक्की किती लोक या स्फोटात जखमी झालेत याचा निश्चित आकडा सांगता येत नसला, तरी सहा महिलांचे मृतदेह मदतकार्य करणाºया टीमच्या हाती लागले आहेत.
मरण पावलेल्यांमध्ये एका तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश असून, कामगार असणाºया आपल्या आईसोबत ही मुलगी कारखान्यात आलेली होती. या सर्व महिला उत्तर प्रदेशच्या होत्या.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …