हिंदू रितीरिवाजातून काढली शेळीची अंत्ययात्रा; घातले ब्राह्मण भोजन

जगात असे अनेक लोक आहेत, जे आपल्या पाळीव प्राण्यांची लहान मुलांप्रमाणे काळजी घेतात. त्यांना लहान मुलासारखे एकत्र ठेवता, पण त्रास होतो, जेव्हा तेव्हा हे प्राणी तुम्हाला सोडून निघून जातात. उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे राहणाºया एका व्यक्तीने आपल्या पाळीव बकरीचा मृत्यू संस्मरणीय बनवला. येथे राहणा‍ºया एका प्राणीप्रेमीच्या बकरीचा मृत्यू झाल्याने त्याने शेळीवर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार हे मनुष्यावर करण्यात येतात त्या पद्धतीचेच होते.
कौशांबी येथे झालेल्या या अंत्यसंस्काराचे फोटो व्हायरल होत आहेत. लाकडावर ठेऊन शेळीची शेवटची यात्रा काढण्यात आली. अंतिम संस्कारानंतर, बकरीच्या मालकाने तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी ब्राह्मण मेजवानीदेखील केली. असे प्राणीप्रेम पाहून लोक खूप प्रभावित झाले. मिळालेल्या माहितीनुसार, कौशांबी येथे राहणाºया रामप्रकाश यादव याने आपल्या शेळीवर मुलासारखे प्रेम केले होते. त्याने बकरीचे नाव कल्लू ठेवले. संपूर्ण घर कल्लूवर खूप प्रेम करत असे.

काही दिवसांपासून कल्लूची तब्येत ठीक नव्हती. खूप काळजी घेऊनही कल्लूचा मृत्यू झाला. आपल्या प्रिय कल्लूच्या मृत्यूनंतर रामप्रकाश याने तिला मानवाप्रमाणे निरोप देण्याची योजना आखली. शेळीला आंघोळ घालून लाकडी खाटेवर झोपवले. यानंतर तिच्या चितेला चुनरी आणि झेंडूच्या फुलांच्या हाराने सजवून हिंदू धर्मानुसार तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
कल्लूच्या मृत्यूनंतर तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी ब्राह्मण भोजनही आयोजित करण्यात आले होते. प्रिय कल्लूच्या मृत्यूने रामप्रकाशचे संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. यानंतर कुटुंबातील पुरुष सदस्यांनीही मुंडण केले. हिंदू धर्मात पुरुष अंतिम संस्कारानंतर मुंडण करतात. रामप्रकाशने सांगितले की, कल्लू साडेपाच वर्षांची होती. तिच्या मृत्यूनंतर प्रत्येकजण दु:खी आहे. आता तिच्या तेराव्याची तयारी सुरू आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …