हिंगोलीत लक्झरी बस-ट्रकचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, २५ जखमी

हिंगोली – जिल्ह्यामध्ये बुधवारी दुपारी लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला, तर २० ते २५ जण जखमी झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. हिंगोली-नांदेड मार्गावरील पार्डी मोड फाट्यावर दुपारी दोनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघातातील जखमींना उपचारासाठी कळमनुरी, आखाडा बाळापूर व नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. खासगी बस नांदेड येथून (क्रमांक एमएच-३८, एफ-८४८५) प्रवासी घेऊन हिंगोलीकडे येत होती. यावेळी कळमनुरीकडून आखाडा बाळापूरकडे जाणाऱ्या ट्रकची खासगी बसशी समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या केबिनमध्ये बसलेले काही प्रवासी चालकाच्या समोरील काच फुटून बाहेर फेकले गेले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …