दुबई – वेगवान गोलंदाज टिम साऊदीच्या मते, पहिल्या सामन्यात पराभव पत्कारल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड दोन्ही टी-२० विश्वचषक सुपर-१२ मधील सामन्यात रविवारी एकमेकांना पराभूत करण्यास उत्सुक असतील, ज्यामुळे हा सामना रोमहर्षक होण्याची अपेक्षा आहे.
भारत आणि न्यूझीलंडला पहिल्या सामन्यात पाकिस्तानने पराभूत केले. विराट कोहलीच्या संघाला १० विकेटने व केन विलियम्सनच्या संघाला ५ विकेटने पराभव पत्कारावा लागला. साऊदीने सराव सत्रानंतर म्हणाला की, भारतीय संघ सर्वोत्तम आहे व अनेक वर्षांपासून ते चांगली कामगिरी करत आहेत. पराभवानंतर ही ते विजयासाठी उत्सुक असतील. दोन्ही संघाच्या वतीने हा सामना रोमहर्षक असेल. तो पुढे म्हणाला, पहिला सामना नेहमीच कठीण असतो. येथे कोणताही सामना सोप्पा नाही. न्यूझीलंड या स्पर्धेत पहिल्यांदा दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळेल, तर भारताला पहिल्या सामन्यात याच मैदानात पराभव पत्कारावा लागला. साऊदी म्हणाला, आम्हाला ठाऊक आहे की, येथील परिस्थिती न्यूझीलंडपेक्षा वेगळी आहे. अशात परिस्थितीनुसार सामावून घेणे यशाची गुरुकिल्ली ठरेल व आम्हाला या मैदानात लवकरच परिस्थितीनुसार सामावून घ्यावे लागेल. येथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळत आहे.