हा सन्मान खूप जणांचे तोंड बंद करेल – कंगना

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला सोमवारी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यानंतर कंगना खूपच खूश असून, तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत फॉलोअर्सचे आभार मानले आहेत.

पुरस्कार मिळाल्यानंतर कंगनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना, तिने या पुरस्काराचे श्रेय आपले माता-पिता तसेच गुरूला दिले आहे. या व्हिडीओमध्ये कंगनाने म्हटले आहे, ‘मित्रांनो, एक कलाकार या नात्याने मला खूप प्रेम, सन्मान आणि पुरस्कार मिळाला आहे, परंतु आज पहिल्यांदा आयुष्यात एक आदर्श नागरिक होण्याच्या नात्याने मला पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पद्मश्री या देशाकडून, सरकारकडून मिळाला आहे आणि मी खूप आभारी आहे. जेव्हा मी माझे करिअर लहान वयात सुरू केले होते, तेव्हा मला यश नाही मिळाले. तब्बल ८ ते १० वर्षांनी मला जेव्हा यश मिळाले तेव्हा मी त्या यशाचा आनंद न घेता अनेक गोष्टींवर काम सुरू केले. अनेक प्रकारचे फेअरनेस प्रोडक्ट्स करण्यास नकार दिला, आयटम नंबरवर बहिष्कार टाकला. मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊसबरोबर काम करण्यास नकार दिला. खूप सारे शत्रूही बनवले, पैशांपेक्षा जास्त शत्रू बनवले.’
कंगना पुढे म्हणाली, ‘आणि जेव्हा देशाविषयी जास्त जागरूकता मनात निर्माण झाली, तेव्हा देश तोडणाऱ्या शक्ती असोत, की शत्रू देश असो, त्यांच्याविरोधात आवाज उठवला आणि माहीत नाही अजून किती केसेस आहेत माझ्यावर. लोक मला नेहमी विचारतात की, काय मिळते हे सारे करून?, का करतेस?, हे तर आपले काम नाहीयं?, तर त्या लोकांकरिता मला उत्तर सापडले आहे, हा जो पद्मश्रीच्या रूपात मला सन्मान मिळाला आहे, तो अनेक लोकांचे तोंड बंद करेल. मी मनापासून या देशाचे आभार मानते. जय हिंद.’

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …