ठळक बातम्या

हार्दिक पंड्याला ऑलराऊं डर म्हणायचे का? कपिल देव यांचा सवाल

कोलकाता – मागील काही काळात भारतीय संघात बरेच बदल झाले आहेत. नव्या दमाचे खेळाडू संघात येत असल्याने फॉर्म बाहेर असलेल्या खेळाडूंना संघ व्यवस्थापन थेट बाहेरचा रस्ता दाखवत आहे. अशामध्ये जगातील अव्वल फलंदाज असणारा भारताचा कर्णधार विराट कोहली यानेही फॉर्म नसल्याने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. त्यामुळे आता कोणाचेच संघातील स्थान शाश्वत म्हणता येणार नाही. अशातच संघातील ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्या हाही खास फॉर्ममध्ये नसताना माजी दिग्गज ऑलराऊंडर कपिल देव यांनी त्याच्याबद्दल एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
कपिल यांनी हार्दिकबद्दल बोलताना थेट त्याच्या संघातील भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, ऑलराऊंडर खेळाडूचे काम गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही करणे असते. पण हार्दिक सध्या गोलंदाजी करीत नसल्याने त्याला ऑलराऊं डर कसे म्हणायचे? असा सवाल त्यांनी केला आहे. सध्या त्याला योग्य सराव करून स्वत:ला वेळ देण्याची गरज आहे. तरच तो पुन्हा गोलंदाजी करून फॉर्ममध्ये परत येऊ शकतो. कपिल देव येथील रॉयल कोलकाता गोल्फ कोर्स येथे बोलत होते. कपिल देव यांना क्रिकेटसह गोल्फ खेळण्यातही रस असल्याने ते अनेकदा गोल्फ खेळताना दिसून येत असतात.
हार्दिकच्या फॉर्मबद्दल बोलताना कपिल देव म्हणाले, हार्दिक एक अप्रतिम आणि संघातील अत्यंत महत्त्वाचा फलंदाज आहे, पण गोलंदाजीत सुधारणा करण्याकरिता त्याला आणखी सामने खेळण्याची गरज आहे. त्याने आणखी चांगली कामगिरी केल्यानंतर आपण त्याच्याबद्दल काही बोलू शकतो.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …