ठळक बातम्या

हाय हिल्समुळे पडता पडता वाचली मलाईका

बॉलीवूड अभिनेत्री मलाईका अरोरा ही नेहमी आपल्या स्टाईल आणि बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत असते. मलाईकाचा हा बोल्ड अंदाज सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होत असतो, परंतु आपल्या या कपड्यांमुळे तसेच बोल्ड अंदाजांमुळे मलाईका जास्त करून ट्रोलच होत असते. आता पुन्हा एकदा मलाईका ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. यावेळेस तिला तिच्या हाय हिल्स सँडल्समुळे ट्रोल व्हावे लागले आहे.
खरेतर करिश्मा कपूरने रविवारी रात्री आपल्या इथे पार्टी ठेवली होती. तिची ही पार्टी अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोरा यांच्या कोरोनातून मुक्त होण्याच्या आनंदाप्रित्यर्थ ठेवण्यात आली होती. या पार्टीत मलाईकाने आपला बॉयफ्रेंड अर्जुन कपूर बरोबर हजेरी लावली होती. मात्र करिश्माच्या घरी कारमधून उतरत असताना मलाईकाचा अचानक तोल गेला आणि ती तोंडावर आपटता आपटता वाचली. तिचा बॅलेन्स गेल्याचे पाहताच कुणीतरी तिचा हात धरुन तिला सावरले. मलाईकाचा हा व्हिडीओ सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओत मलाईका आपल्या कारमधून उतरताना दिसून येत आहे. त्यावेळी तिने हिरव्या रंगाचा डीप नेक ब्रालेट परिधान केला होता व त्याच्यासोबत तिने ग्रीन शॉर्ट्स घातले होते. त्यावेळी तिने जरा जास्तच हिल असलेली सँडल घातली होती. जास्त हिल असल्याने कारमधून उतरताना मलाईकाचा तोल गेला आणि ती अडखळून पडणार तितक्याच एका व्यक्तीने तिला सावरले व ती पडता पडता वाचली, परंतु ट्रोलर्सला तर निमित्तच हवे होते. त्यांनी तिला तिच्या हाय हिल्सवरून ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युझरने लिहिले आहे ‘म्हातारपणात हिल्स घातली की असेच होणार,’ तर दुसऱ्या युझरने कमेंटमध्ये लिहिले आहे,’म्हातारी झालीयंस सुधर आता.’

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …