यूकेमध्ये राहणाºया ३१ वर्षीय अॅलेक्स आॅर्चिनने एक विचित्र विक्रम केला आहे. अॅलेक्सने जगातील सर्वात लहान कारच्या सहाय्याने यूकेच्या एका टोकापासून दुसºया टोकापर्यंतचा प्रवास केला. सामान्य कारमध्ये हा प्रवास अवघ्या १४ तासांत पूर्ण होतो, पण अॅलेक्सला या छोट्या कारमधून प्रवास करायला पूर्ण तीन आठवडे लागले.
जगातील अनेकांना विचित्र रेकॉर्ड बनवण्याचा शौक आहे. काही लोक या छंदात एखादे सोपे कामही कठीण करतात. ब्रिटनमध्ये राहणाºया ३१ वर्षीय अॅलेक्सनेही असा सोपा प्रवास खूप कठीण करून टाकला. त्याने यूकेत एका टोकापासून दुसºया टोकापर्यंत प्रवास केला, तेही जगातील सर्वात लहान कारमध्ये. या संपूर्ण प्रवासात अॅलेक्सच्या कारचा वेग २३ ेस्रँ होता. गुगल मॅप्सवर आधारित, जॉन ओ’ग्रोट्स ते लँड्स एंडपर्यंत चालणारा हा प्रवास पूर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त १४ तास लागतात. पण हा प्रवास अॅलेक्सने तीन आठवड्यांत पूर्ण केला.
एलेक्सने १३ नोव्हेंबरला हा प्रवास सुरू केला. तीन आठवड्यांनंतर त्याचा प्रवास संपला. गाडी इतकी छोटी होती, वरून वेग कमी असल्याने रस्त्यात अॅलेक्सकडे बघणाºयांना ती दिसत होती. ज्या कारमध्ये अॅलेक्सने प्रवास पूर्ण केला ती पील ढ5० आहे. तिची निर्मिती १९६२ मध्ये झाली. या गाडीला एकच दरवाजा आहे. ही १९६२ ते १९६५ या काळात बनवली गेली. यानंतर कारचे उत्पादन बंद करण्यात आले.
तिचे युनिट २००७ मध्ये बीबीसीच्या टॉप गियर नावाच्या शोद्वारे बनवले गेले आणि कारचे पेट्रोल मॉडेल २०११ मध्ये बाजारात आले. अॅलेक्सचा हा प्रवास १४०० मैलांचा होता. या छोट्या कारमध्ये तीन आठवडे बसणे आव्हान होते. अॅलेक्सची उंची ५ फूट ११ इंच आहे. अशा स्थितीत या कारमध्ये सामावणे हे आव्हान होते. कार फक्त १३७ सेमी लांब आणि ९९ सेमी रुंद होती. त्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते हवामानाचे. गाडीचे वजन खूपच कमी होते. यामुळे, यूकेमध्ये नुकत्याच झालेल्या वादळात ती चालवणे खूप कठीण होते. पण अॅलेक्सने यश मिळवले.
आपल्या खडतर प्रवासाविषयी बोलताना अॅलेक्स म्हणाला की, एक क्षण असा होता, जेव्हा त्याचे कारवरील नियंत्रण सुटले, पण त्यानंतर त्याने स्वत:ची काळजी घेतली. प्रवासादरम्यान लोकांनी अॅलेक्सच्या फोटोसाठी पोज दिली आणि अनेकांनी त्याचे कौतुकही केले. अॅलेक्सच्या म्हणण्यानुसार, लोकांनी खूप पाठिंबा दिला. अनेकांनी त्याच्या गाडीत तेल भरले. वाटेत अनेकांनी त्याला जेवू घातले. अॅलेक्ससाठी हा आतापर्यंतचा सर्वात संस्मरणीय अनुभव ठरला.