हवाईदलाचे भरवशाचे हेलिकॉप्टर

कुन्नूरमध्ये बुधवारी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह अन्य बारा अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निधन झाले. हे हेलिकॉप्टर आयएएफ एमआय १७ व्ही-५ श्रेणीतील होते. दोन इंजिने असलेले हे मध्यम लिफ्ट हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते लढाऊ भूमिकेतून सैनिक आणि अधिकाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. भारतीय हवाईदलाचे भरवशाचे हेलिकॉप्टर अशी एमआय १७ व्ही-५ची ओळख. कार्झन हेलिकॉप्टर्स या रशियन कंपनीने हे हेलिकॉप्टर विकसित केले आहे. भारतीय हवाईदलाकडे आतापर्यंत उपलब्ध असलेल्या एमआय सीरिज हेलिकॉप्टरमधील हेलिकॉप्टरचा हा सर्वात प्रगत वर्ग आहे. भारतीय हवाई दल या मालिकेतली अनेक हेलिकॉप्टर वापरत आहे. या हेलिकॉप्टरचे मुख्य कार्य म्हणजे सैन्याची एका ठिकाणाहून दुसऱ्­या ठिकाणी वाहतूक. ते निर्वासन आणि बचाव कार्य इत्यादींमध्येही वापरले जाते. गरज पडल्यास हलकी शस्त्रे वापरून आक्रमणाची भूमिकादेखील निभावण्यात हे हेलिकॉप्टर अग्रेसर आहे. हे हेलिकॉप्टर अतिशय थंड ते अतिशय उष्ण वातावरणात सहज उडू शकते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …