- अंकिता पाटील-ठाकरे कोविड पॉझिटिव्ह
मुंबई – भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पाठोपाठ कन्या अंकिता पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अंकिता पाटील यांनी ट्विटरवरून याविषयी माहिती दिली. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे आणि अंकिता विवाहबंधनात अडकले आहेत.
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी, असे ट्विट अंकिता पाटील यांनी केले.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना वाढत आहे. आपल्या सर्वांच्या व सहकाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मी काल (शनिवारी) कोरोना तपासणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. पुढील उपचारासाठी मी रुग्णालयात दाखल झालो आहे. इच्छा असताना देखील ही निर्बंधांमुळे व आपल्या सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या सर्वांना भेटता येत नाही व आपले प्रश्न सोडवता येत नाहीत. परंतु प्रत्यक्ष मी जरी आपल्या सर्वांना भेटू शकत नसलो, तरीही आपण मला दूरध्वनीद्वारे किंवा माझ्या कार्यालयास संपर्क करून आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी निसंकोचपणे सांगू शकता, असे ट्विट हर्षवर्धन पाटील यांनी ३१ डिसेंबरला केले होते.