ठाणे – अवांतर धावांची उपयोगी जोड मिळाल्यामुळे स्पोर्टिंग क्लब कमिटीने दहिसर स्पोर्ट्स क्लबचा ३ विकेट्सनी पराभव करत डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित अर्जुन मढवी स्मृती महिला टी २० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. सेंट्रल मैदानावर खेळलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दहिसर स्पोर्ट्स क्लबने २० षटकांत ४ बाद ११४ धावसंख्येचे आव्हान उभे केले. या धावसंख्येत एकट्या राधिका ठक्करचा ५८ धावांचा वाटा होता. राधिकाने तब्बल आठ चौकारानिशी ही स्पर्धेतील सलग तिसरी अर्धशतकी खेळी साकारली होती. मानसी चव्हाण आणि निशा आम्ब्रेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला, या आव्हानाचा पाठलाग करताना घरच्या मैदानावर खेळणारा स्पोर्टिंग क्लब कमिटीचा संघ चांगलाच अडचणीत आला होता, पण दहिसर स्पोर्ट्स क्लबच्या गोलंदाजांनी विकेट्स मिळवूनही चेंडूवर नियंत्रण न राखल्याने, त्यामुळे मिळालेल्या अवांतर धावांचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला मिळाला. स्पोर्टिंग क्लब कमिटीने १८ षटकांत ७ बाद ११६ धावा स्पर्धेच्या उपांत्य फेरीतले स्थान पक्के केले. गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही छाप पाडताना निव्याने १७, खुशी ठक्करने १२ आणि निधी दावाडाने ११ धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात आपल्या खात्यात एक विकेट्स जमा करणाऱ्या बतुलने या सामन्यात तीन, प्रियंका गोलीपकर आणि सौम्या सिंगने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. सामन्यात राधिकाची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. अन्य लढतीत विजय क्रिकेट क्लबने कामत मेमोरियल क्रिकेट क्लबचा ७ विकेट्सनी पराभव केला, स्पर्धेच्या ‘ड’ गटातील केवळ औपचारिकता ठरलेल्या सामन्यात कामत मेमोरियल संघाने २० षटकांत ६ बाद ११८ धावा केल्या होत्या.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …