स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिलमध्ये घ्याव्यात; अजित पवारांचा सल्ला

मुंबई – ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी वेळ लागणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव राज्य सरकारने पारित केला आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यांत पाऊस नसतो. त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिलमध्ये घेता येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचवले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात. त्यानंतर तीन-एक महिन्यात म्हणजे मार्च अखेरपर्यंत ओबीसींचा इम्पेरिकल डेटा द्यावा. तो दिल्यानंतर एप्रिलमध्येही निवडणुका घेतल्या तरी चालतील. राज्यात ओबीसी ५४ टक्के आहे. त्यांना त्यांचे प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. हा त्यांचा हक्क आहे, पण शेवटी आम्ही वकिलामार्फत जे काही काम करायचे ते केले. आता जानेवारीत तारीख ठेवली आहे. तोपर्यंत डेटा मिळवण्याचे काम गतीने करू. आयोगाला सर्व सुविधा देऊ. डेटा मिळाल्यानंतर या सर्वातून मार्ग काढू अशी परिस्थिती दिसते, असे अजित पवारांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधकांना राजकारण न करण्याचे आवाहन केले. यात वेगळ्या प्रकारचे राजकारण करू नये. गैरसमज निर्माण करू नये. या प्रकरणाकडे सहानुभूतीने पाहिले पाहिजे. ९७ टक्के डेटा तसे नाही. त्यात खूप चुका आहे, असे बोलले जाते. आमच्या असेंबलीत चर्चा सुरू असताना त्यात काही लाख चुका आहेत, असे सांगितले गेले. चुका आहेत तर डेटा काय गोळा केला असा प्रश्न तयार होतो, अशी अडचणही त्यांनी मांडली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …