- श्रेयस करणार कसोटीत पदार्पण
कानपूर – कर्णधार विराट कोहली व वनडेतील उपकर्णधार रोहित शर्मासमवेत काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ गुरुवारी येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दमदार न्यूझीलंडविरुद्ध स्थानिक मैदानात आपला दबदबा कायम राखण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करेल, जो मागील काही वेळेपासून खराब फॉर्मात आहे, तसेच जायबंद के. एल. राहुल व आरामावर पाठवण्यात आलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची सेवा मिळणार नाही, पण अजिंक्यच्या नेतृत्वात संघाने जवळपास अशा परिस्थितीतच ऑस्ट्रेलियामध्ये दमदार विजय मिळवला होता. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात करण्यात आलेल्या त्या कामगिरीतून प्रेरणा घेत न्यूझीलंडला योग्य धडा शिकवण्याचा प्रयत्न करेल, ज्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या विश्व कसोटी चॅम्पियन बनण्याच्या अपेक्षांवर पाणी फेरले होते.
मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. त्याला सूर्यकुमार यादववर प्राधान्य दिले. कर्णधार रहाणे म्हणाला की, श्रेयस अय्यर पदार्पण करेल, पण मी संघ नियोजनाबाबत जास्त खुलासा करणार नाही. नुकतेच असे कमी पाहण्यास मिळाले की, जेव्हा भारतीय कसोटी संघात रोहित व राहुलची सलामी जोडी, कर्णधार विराट वा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतशिवाय खेळली आहे, पण नव नियुक्त मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी आपल्या इतर खेळाडूंना आजमावण्याची संधी मिळेल. फलंदाजीत फक्त रहाणे, चेतेश्वर पुजारा व मयंक अग्रवाल यांनाच १० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. जर अग्रवाल चांगली कामगिरी करतो तर राहुलसाठी पुनरागमन करणे कठीण होईल. शुभमन गिल देखील चांगली फलंदाजी करतो तर दोन्ही नियमित सलामी फलंदाजांचे पुनरागमन झाल्यास संघ व्यवस्थापन त्यांना मधल्या फळीत उतरवू शकतो. या सामन्यात अजिंक्यवर ही सर्वांच्या नजरा असतील. त्याने मागील ११ कसोटी सामन्यात १९ च्या सरासरीने धावा केल्या. स्थानिक खेळपट्टीवरील दोन्ही सामन्यात अपयशी राहिल्यास त्याला पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत जाणाऱ्या संघात जागा मिळवणे कठीण होईल. सरावादरम्यान अजिंक्य आत्मविश्वासात दिसला नाही. अशा परिस्थितीत त्याला अशा संघाचे नेतृत्व करायचे आहे, ज्यात स्टार खेळाडू नाहीत. अशात एक कर्णधार व एक फलंदाजाची भूमिका यांच्यात अजिंक्यला संतुलन निर्माण करावे लागेल. अशाच प्रकारे संघातील सर्वात सीनियर गोलंदाजी ईशांत शर्मासाठी देखील स्थिती अनुकूल नाही. नेट सरावात तो लयात दिसला नाही. जर मोहम्मद सिराजला अंतिम एकादशमधून हटवत ईशांतचा समावेश केला जातो, तर त्याला संघ व्यवस्थापनासमोर आपण योग्य असल्याचे सिद्ध करण्याचा दबाव असेल. उमेश यादव अंतिम एकादशमध्ये जागा मिळवणे निश्चित आहे.
श्रेयसचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील रेकॉर्ड चांगला आहे, पण तो २०१९ पासून मोठ्या फॉरमेटमध्ये खेळला नाही व अशात त्याच्यासाठी येथे कठोर आव्हान असेल. द्रविड यांनी अय्यरला डावखुरा थ्रो डाऊन विशेषज्ज्ञ नुवानसारख्या गोलंदाजीचा सराव केला, जसे नील वॅगनर करतो. अय्यर पदार्पणाने दमदार कामगिरी करत मधल्या फळीतील आपली जागा निश्चित करेल. न्यूझीलंडचा विचार करता त्यांच्या वतीने टिम साऊदी व नील वॅगनर नव्या चेंडूची जबाबदारी घेतील, तर फिरकी विभागात स्पिनर अयाज पटेल व मिशेल सँटनरशिवाय ऑफ स्पिनर विलियम सोमरविलेला अंतिम एकादशमध्ये संधी मिळू शकते. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी चालू होईल.