स्कॉट बोलँडची कमाल : ४ षटके, ७ धावा आणि ६ विकेट्स

मेलबर्न – ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या स्कॉट बोलँडने कमालच केली. पहिल्या डावात फक्त १ विकेट घेण्यात यश आलेल्या स्कॉट बोलँडने दुसऱ्या डावात फक्त ४ षटके टाकत ७ धावांत ६ फलंदाजांना तंबूत धाडले. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडला एक डाव आणि १४ धावांच्या नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्याचा मानकरी म्हणून स्कॉट बोलँडला नावाजण्यात आलेच, पण याचबरोबर त्याला प्रतिष्ठेच्या मुलाघ मेडलनेही सन्मानित करण्यात आले. स्कॉट बोलँड याने अवघ्या ७ धावांत ६ विकेट्स घेत इंग्लिश संघाचे ऐतिहासिक पतन घडवून आणले. ४ ओव्हर, १ मेडन, ७ धावा आणि ६ विकेट्स ही आकडेवारी त्याच्या कामगिरीबाबत सर्व काही सांगून जाणारी आहे. पदार्पणातील सर्वोत्तम कामगिरीसह बोलँडने अनेक विक्रमांची नोंद केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …