ठळक बातम्या

स्कॉटलंड की, नामिबिया कोण मारणार बाजी?

अबुधाबी – क्वालिफायर्समध्ये दोन सर्वोत्तम विजयांसह सुपर-१२ साठी क्वालिफाय करणारा नामिबिया आपली शानदार मोहीम कायम राखण्याच्या उद्देशाने आयसीसी टी-२० विश्वचषकात बुधवारी येथे एक इतर क्वालिफायर स्कॉटलंडचा सामना करेल.

गेरहार्ड इरासमस व त्याचे सहकारी विश्वचषकासाठी अनोळखे चेहरे आहेत; पण त्यांनी नेदरलँड्सचा सहा विकेटनं पराभव केल्यानंतर आयर्लंडवर आठ विकेटने विजय मिळवत सुपर -१२ मध्ये जागा मिळवली. हा त्यांच्या देशासाठी ऐतिहासिक क्षण होता, ज्यांचा क्रिकेटबाबत कोणताच इतिहास राहिलेला नाही. आयर्लंडविरुद्धचा विजय एखाद्या कसोटी खेळणाऱ्या देशाविरुद्ध त्यांचा पहिला विजय आहे, ज्यामुळे नामिबियाने पुढील वर्षाच्या टी-२० विश्वचषकातही आपली जागा सुनिश्चित केली आहे. नामिबिया आता जगातील सर्वोत्कृष्ट संघांना भिडण्यास सज्ज आहे, तसेच ग्रुप दोनमधील स्कॉटलंडविरुद्ध विजयाने त्यांचे अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान व न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आत्मविश्वास वाढेल. स्कॉटलंडने क्वालिफायर्समध्ये तीन विजय मिळवत सुपर-१२ मध्ये जागा मिळवली; पण येथे पहिल्याच सामन्यात त्यांना अफगाणिस्तानकडून १३० धावांनी लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला, ज्यामुळे निश्चितपणे त्यांच्या खेळाडूंचा आत्मविश्वास ढासळलेला असेल, ज्याचा नामिबिया फायदा घेऊ पाहील. काइल कोइत्झरच्या नेतृत्वातील संघ १९१ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना १०.२ षटकार ६० धावांत गारद झाला. त्यांच्यासाठी एवढ्या लवकर या पराभवातून सावरणे आव्हानात्मक असेल. नामिबियाने मागील दोन सामन्यांत लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली फलंदाजी केली. त्यांच्या वतीने कर्णधार इरासमस व अष्टपैलू डेव्हिड वीजने जास्त धावा केल्या. वीजने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. गोलंदाजीत त्याच्यासोबत डावखुरा वेगवान गोलंदाज जॉन फ्रँलिंकशी टक्कर होईल, ज्याने आतापर्यंत पाच विकेट मिळवल्या आहेत. स्कॉटलंडला जर अफगाणिस्तानकडून मिळालेल्या पराभवातून सावरायचे असेल, तर रिची बॅरिंग्टन, जॉर्ज मुन्से व मॅथ्यू क्रॉसला चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीत जॉश डेवी सर्वात यशस्वी राहिला आहे. त्याने आतापर्यंत ४ सामन्यांत ९ विकेट मिळवलेत. त्याच्याशिवाय साफयान शरीफ, मार्क वॉट आणि ब्रँड व्हीलने ही योगदान दिले. हा सामना भारतीय वेळेनुसार साडेसात वाजता सुरू होईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …