ठळक बातम्या

स्कॅम 1992 ने फिल्मफेअर ओटीटीमध्ये पटकावले सर्वाधिक पुरस्कार


कोरोना महामारीमुळे लोकांना एका मागे एक अशा अनेक संकटांना तोंड द्यावे लागले .अनेक लोकांनी आपले नोकरी-धंदे गमावले तर काहींनी आपल्या जवळच्या व्यक्तींना. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका मनोरंजन उद्योगालाही सहन करावा लागला. चित्रपटगृहे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली परंतु त्याचा फायदा ओटीटी प्लॅटफॉर्मला झाला. यामध्ये अनेक नवोदित कलाकार उदयास आले तर अशा अनेक कथा सादर झाल्या ज्यांनी प्रेक्षकांच्या ह्रदयाला स्पर्श केला. आता फिल्मफेअरने 2021 च्या ओटीटी ॲवॉर्ड्सची घोषणा केली आहे. या सर्वांमध्ये प्र्रतिक गांधी अभिनित स्कॅम 1992 ने सर्वाधिक पुरस्कार पटकावले आहेत. स्कॅमला सर्वोत्कृष्ट अभिनेता व दिग्दर्शकासह तब्बल 11 पुरस्कार मिळाले आहेत. फिल्मफेअरमध्ये पुरस्कार जिंकणाऱ्या विजेत्यांची ही यादी-
बेस्ट ओरिजनल साऊंडट्रॅक ॲवॉर्ड – अंचित ठक्कर -स्कॅम 1992
बेस्ट बॅकग्राऊंड म्युझिक ॲवॉर्ड- स्कॅम 1992
बेस्ट प्रोडक्शन डिझाईन ॲवॉर्ड – स्कॅम 1992
बेस्ट कॉस्च्युम डिझाईन ॲवॉर्ड – स्कॅम 1992
बेस्ट व्हीएफएक्स ॲवॉर्ड – स्कॅम 1992
बेस्ट सिनेमेटोग्राफर ॲवॉर्ड-स्कॅम 1992
बेस्ट डायलॉग ॲवॉर्ड-स्कॅम 1992
बेस्ट ॲडेप्टीव्ह स्क्रीनप्ले ॲवॉर्ड – स्कॅम 1992
सर्वश्रेष्ठ संपादन ॲवॉर्ड – स्कॅम 1992
बेस्ट ॲक्टर ॲवॉर्ड – प्रतिक गांधी – स्कॅम 1992
बेस्ट दिग्दर्शक ॲवॉर्ड – हंसल मेहता- स्कॅम 1992
तर मनोज वाजपेयी यांच्या द फॅमिली मॅन 2 ला बेस्ट ओरिजनल स्टोरी आणि बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले हे दोन ॲवॉर्ड देण्यात आले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …