ठळक बातम्या

सौरव गांगुलींच्या तब्येतीत सुधारणा


कोलकाता – कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करावे लागलेले बीसीआय अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरभ गांगुलींच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. वुडलँडस रुग्णालयाच्या एमडी आणि सीईओ रूपाली बसू यांनी प्रसारमाध्यमांना गुरुवारी गांगुलींच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची गती स्थिर आहे, तसेच ऑक्सिजनचा प्रवाही तीन दिवसांच्या उपचारानंतर सामान्य झाला आहे. बुधवार आणि गुरुवारी रात्री चांगली झोप लागली, तसेच गुरुवारी सकाळी नाश्ता आणि दुपारी जेवताना कोणतीही समस्या जाणवली नाही. वरिष्ठ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. गांगुलींवर जानेवारी महिन्यात ॲजियोप्लास्टी करण्यात आली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …