ठळक बातम्या

सौरव गांगुलींचे कोहलीबद्दल मोठे वक्तव्य

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पुन्हा एकदा विराट कोहलीबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. सौरव गांगुली यांनी विराट कोहलीच्या भांडखोर वृत्तीवर भाष्य करीत तो खूप भांडण करतो असे म्हटल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. गांगुलींनी मात्र या मुद्यावर मीडियाशी थेट कोणताही संवाद साधला नाही. मला विराट कोहलीचा ॲटिट्यूड आवडतो, मात्र तो भांडण खूप करतो, असे गांगुली म्हणाल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे. गांगुली संकेतांमधून बोलत असले, तरी बीसीसीआय यावर अद्याप अधिकृ तरित्या काहीही बोलले नाही. कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत, त्याचे उत्तर देण्यासाठी निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा पत्रकार परिषद घेऊन कोहलीला जबाव देणार होते, मात्र त्यांना थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कोहलीच्या पत्रकार परिषदेवर बीसीसीआय नाराज आणि सौरव गांगुली रागात असल्याची चर्चा आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …