सोलापूर – सोलापुरातील तीन मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. मुंबई-पुणे हायवेवरील खोपोलीजवळ झालेल्या अपघातात या तरुणांनी आपला जीव गमावला. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर शहरात शोककळा पसरली होती. दरम्यान, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.
मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात गौरव खरात, सौरव तुळसे आणि सिद्धार्थ राजगुरू यांचे निधन झाले. मृत गौरव खरात हे काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. नितीन राऊत यांना भेटण्यासाठी जात असताना अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेसाठी मोठी गर्दी जमली होती. सोलापुरातील मोदी स्मशानभूमीत एकाचवेळी तीन मित्रांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशीलकुमार शिंदे, नितीन राऊत यांनी खालापूरमध्ये पार्थिवांचे अंत्यदर्शन घेतले होते.