सोमय्यांनी खोटे आरोप करणे बंद करावे; अन्यथा मानहानीचा दावा ठोकणार – लोंढे

नागपूर – भाजपचे किरीट सोमय्या हे खोटे बोलतात, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. किरीट सोमय्या यांनी एका राष्ट्रीय चॅनलवर मंगळवारी डिबेटमध्ये राज्य सरकारवर आरोप केले होते. राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेची टक्केवारी सोमय्या यांनी डिबेटमध्ये जाहीर केली. राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेपैकी ४० टक्के रक्कम शिवसेनेला मिळते. ४० टक्के रक्कम राष्ट्रवादीला मिळते, तर २० टक्के रक्कम काँग्रेसला मिळते, असा आरोप सोमय्या यांनी डिबेटमध्ये केल्याचे लोंढे यांनी सांगितले. सदर आरोप करीत असताना, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नव्हते. सार्वजनिकरित्या असे खोटे आरोप करणे काँग्रेस खपवून घेणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली. सोमय्या नेहमीच खोटे आरोप करीत असतात. त्यांनी केलेले खोटे आरोप रेक्रार्ड केले असून, याची तक्रार नागपूर पोलीस आयुक्तांकडे केली असल्याचे अतुल लोंढे म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …