सोन्यावरील सीमा शुल्क होणार चार टक्के

– सोने तस्करीला वचक बसणार?

मुंबई – भारतात सोन्याला फार महत्त्व असून, त्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे सोने आणि ज्वेलरीशी संबंधित शेअर दरात मोठ्या हालचाली दिसल्या. वाणिज्य मंत्रालयाने सोन्यावरील आयात शुल्कात कपात करून चार टक्के करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या सोन्यावर ७.५ टक्के आयात शुल्क आहे. त्याशिवाय त्यावर आणखी २.५ टक्के कृषी सेस लावण्यात येतो. त्यामुळे एकूण आयात शुल्क १० टक्क्यांवर जाते.
सोन्यावरील आयात शुल्कात कपात करावी, अशी मागणी दीर्घकाळापासून करण्यात येत आहे. आता वाणिज्य मंत्रालयाने त्याचा प्रस्ताव सादर करत या मागणीला बळ दिले आहे. भारत हा मोठ्या प्रमाणावर सोने आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. यावर्षी ९०० टन सोन्याची आयात करण्यात आली. आतापर्यंतची ही सर्वाधिक आयात आहे. सोन्यावरील आयात शुल्क १२ टक्क्यांवरून ७.५ टक्क्यांवर करण्याची घोषणा या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या घोषणेचे स्वागत करण्यात आले होते. वाणिज्य मंत्रालयाने केलेली शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केल्यास त्याचा थेट परिणाम सोन्याच्या तस्करीवर होऊ शकतो. या निर्णयामुळे सोन्याची तस्करी कमी होऊ शकते. भारतात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे सोन्याची आयात होते. त्यामुळे सरकारचा मोठा महसूल बुडतो. यावर्षी ९०० टन सोने आयात झाले आहे, मात्र तरीदेखील जवळपास २५ टक्के सोने बेकायदेशीपणे भारतात आले असल्याचे म्हटले जाते. मागील वर्षी ३५० टन सोने आयात करण्यात आले होते. यावर्षी आयातीत वाढ झाली असून, ९०० टन सोने आयात करण्यात आले आहे. दरम्यान, आता या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम भारतीय सोने बाजारात दिसून येईल. या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल. सोन्याच्या किमती पूर्वीच्या किमतीपेक्षा कमी झालेल्या दिसतील. सोन्याने मध्यंतरी ५२ हजारांच्या घरात व त्याही पुढे उसळी मारली होती, मात्र तरीही सोने खरेदीदारांची संख्या फार काही रोडावली नाही. एका अंदाजानुसार, सोन्याचे भाव प्रति १० ग्राम ४५ ते ४६ हजार राहण्याची शक्यता आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …