सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित आजपासून नवा नियम

  •  न पाळल्यास होऊ शकतो तुरुंगवास

नवी दिल्ली – भारतात सोन्यात गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम मानले जाते, पण आजही सोने खरेदी करताना त्याच्या शुद्धतेबाबत अनेक चिंता आहेत. सोने शुद्ध आहे, त्यात काही भेसळ तर नाही ना, कारण अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत, ज्यात ज्वेलर्स भेसळयुक्त सोने देतात आणि पैसे कमावतात. अशात आजपासून म्हणजेच १ डिसेंबरपासून सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित असा नियम लागू होणार आहे, ज्याचे पालन न केल्यास तुरुंगवास होऊ शकतो.
ज्वेलर्सना ३० नोव्हेंबरपर्यंत दिलेली सवलत देण्याची मुदत मंगळवारी संपली, म्हणजेच आता हॉलमार्किंगचे नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक आहे, असे न केल्यास ज्वेलर्सवर कडक कारवाई केली जाऊ शकते. देशभरातील २५६ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे. याअंतर्गत ज्या ज्वेलर्सची उलाढाल ४० लाखांपेक्षा जास्त आहे किंवा त्यांनी नोंदणी केली आहे, त्यांच्या दुकानातील प्रत्येक दागिन्यावर हॉलमार्क असणे आवश्यक आहे. याशिवाय विकल्या जाणाऱ्या सर्व दागिन्यांवर हॉलमार्किंगही बंधनकारक आहे. त्याचबरोबर ज्वेलर्ससाठी काही मार्गदर्शक तत्वेही तयार करण्यात आली आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या दुकानाबाहेर एक डिस्प्ले बोर्डही लावला जावा, ज्यामध्ये या दुकानात हॉलमार्क केलेले दागिने उपलब्ध आहेत, असे लिहावे. ग्राहकांना हॉलमार्क दाखवण्यासाठी दुकानातच १० एक्सचा ग्लास आणि हॉलमार्किंग शुल्क लिखित स्वरूपात असलेला चार्ट तयार करणे बंधनकारक आहे, तसेच प्रत्येक दुकानात बीआयएस क्रमांक आणि पत्ता देणे आवश्यक आहे. यासोबतच बीआयएसने नियुक्त केलेले काही एजंटही दुकानात जाऊन हॉलमार्किंग, दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग योग्यप्रकारे झाले आहे की नाही, याची तपासणी करणार आहेत, त्यासाठी दुकानांमधून नमुने घेतले जातात. आजपासून हॉलमार्किंगची अंमलबजावणी न केल्यास कारवाईही केली जाणार आहे. याआधीही याबाबत सातत्याने चौकशी केली जात होती, मात्र आता ती बंधनकारक असेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …