सोने ७००, तर चांदी २ हजारांनी स्वस्त

नाशिक – नाशिकच्या सराफा बाजारात बुधवारी सोने जवळपास ७०० रुपयांनी, तर चांदी २ हजारांनी स्वस्त झाले होते. २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४७ हजार ५०० रुपये नोंदवले गेले, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली.

सध्या दिवाळीनिमित्त नाशिकच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याला मागणी वाढली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी मंगळवारी अंदाजे ५० कोटींची उलाढाल झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत ही सर्वात चांगली उलाढाल झाल्याचे समजते. दरम्यान सोन्याचे भाव सध्या कमी होताना दिसत आहेत. नाशिकमध्ये १ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,८१०, तर २२ कॅरेट सोन्याचे दर हे ४५,५९० होते. त्यानंतर या दरात घसरणच पाहायला मिळाली. सराफा बाजारात वसुबारसेच्या दिवशी सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४८,००० रुपये नोंदवले गेले, तर २२ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४६,५०० रुपये नोंदवले, तर चांदीचे दर किलोमागे ६५,००० रुपये नोंदवले गेले. धनत्रयोदशी दिवशी मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४८ हजार २०० रुपये नोंदवले गेले, तर २२ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४६ हजार ९०० रुपये आणि चांदीचे दर किलोमागे ६५ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. बुधवारी सोन्याचे भाव जवळपास ७०० रुपयांनी स्वस्त झाले. २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४७ हजार ५०० रुपये नोंदवले गेले, तर २२ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅमच्या मागे ४६ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. चांदीमध्ये जवळपास दोन हजारांनी घसरण झाली. किलोमागे चांदीचे दर ६३ हजार ५०० रुपये नोंदवले गेले, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …