अभिनेत्री आलिया भट्ट ही आपल्या स्टायलिश अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे क्यूट आणि स्टायलिश फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. आता आलियाच्या लहानपणीच्या फोटोंचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो तिची आई व अभिनेत्री सोनी राजदान यांनी शेअर केला आहे.
रविवारी सोनी राजदान यांनी आपल्या कुटुंबियांच्या जुन्या फोटोंचा एक व्हिडिओ बनवून तो आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला होता. यात आलियाचे क्यूट आणि स्टायलिश बालपण पहायला मिळते. या व्हिडिओमध्ये लहानगी आलिया आपले पिता महेश भट्ट तसेच बहीण शाहीन भट्ट यांच्या सोबत मस्ती करताना पहायला मिळते. हा अनमोल व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करुन सोनी राजदान यांनी कॅप्शनमध्ये लिहिले,’ जेव्हा आम्ही छोटे होतो, तसे आजही आम्ही छोटो आहोत.’ आलियाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप पसंत केला जात आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …