सोनिया गांधींनी २०२० पासून भरले नाही बंगल्याचे भाडे

नवी दिल्ली – काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी त्यांच्या १० जनपथ येथील निवासस्थानाच्या भाड्याची रक्कम २०२० वर्षापासून भरलेली नसल्याची माहिती समोर आली आहे, तसेच काँग्रेस पक्षाने त्यांच्या मुख्य कार्यालयाबरोबरच इतर अनेक इमारतींची भाडी थकवल्याची माहिती आरटीआय म्हणजेच माहिती अधिकार कायद्यांतर्गत समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आता सोनिया गांधी यांच्या घराबरोबरच काँग्रेसशी संबंधित इतर इमारतींचे भाडे भरण्यासाठी वर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय शहर विकास आणि निवास मंत्रालयाने आरटीआय कार्यकर्ता सुजित पटेल यांनी दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देताना थकीत भाडेपट्टीसंदर्भातील माहिती दिली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सरकारी इमारतींचे भाडे दिलेले नाही आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबरोबरच २४ अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाचे आणि चाणक्यपुरीमधील सोनिया गांधींच्या खासगी सचिवांच्या घराचे भाडेही बºयाच काळापासून थकलेले आहे. या बंगल्यांच्या थकित भाड्याची रक्कम ही काही लाखांमध्ये आहे.
माहिती अधिकार अर्जाला मंत्रालयाने दिलेल्या उत्तरामध्ये काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयाचे १२ लाख ६९ हजार ९०२ रुपयांचे भाडे थकलेले आहे. २०१२ मध्ये या कार्यालयाचे शेवटचे भाडे भरण्यात आले होते, तर सोनिया गांधींच्या घराचे ४ हजार ६१० रुपये भाडे अद्याप भरण्यात आलेले नाहीय. सप्टेंबर २०२० मध्ये या घराचे शेवटचे भाडे देण्यात आले होते. त्याचप्रमाणे चाणक्यपुरीमध्ये राहणाºया सोनिया गांधींचे खासगी सचिव विसेंट जॉर्ज यांच्या बंगल्याचेही भाडे बाकी आहे. जॉर्ज हे सी १०९ बंगल्यामध्ये वास्तव्यास असून, या बंगल्याचे ५ लाख ७ हजार ९११ रुपये भाडे बाकी आहे. या बंगल्याचे शेवटचे भाडे आॅगस्ट २०१३ मध्ये भरण्यात आलेले.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सर्व राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांना तीन वर्षांमध्ये स्वत:चे कार्यालय स्थापन करावे लागते. त्यानंतर त्यांना सरकारी बंगला रिकामा करावा लागतो. काँग्रेसला ९ ए राऊस एव्हेन्यूमध्ये जमीन देण्यात आली असून, यावर त्यांनी पक्षाचे कार्यालय उभारणे अपेक्षित आहे. काँग्रेसने २०१३ मध्ये २४ अकबर रोडवरील बंगल्यातील आपले कार्यालय रिकामे करणे अपेक्षित होते, जे अद्यापही खाली करण्यात आलेले नाहीय.
सध्या या पूर्ण प्रकरणामध्ये भाजपने वर्गणी गोळा करण्याची मोहीम सुरू केलीय. भाजपचे नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी वर्गणी गोळा झाल्यानंतर ती आम्ही सोनिया गांधींना पाठवून देऊ असेम्हटले आहे. बुधवारी बग्गा यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भात पोस्ट केलीय. मी राजकीय मतभेद विसरून एक व्यक्ती म्हणून त्यांची मदत करू इच्छितो अशी उपहासात्मक ओळही या पोस्टमध्ये बग्गा यांनी लिहिलीय. मी एक मोहीम सुरू करत सोनिया गांधींच्या खात्यामध्ये १० रुपये पाठवले आहेत, असेही बग्गा म्हणालेत.

भाजपचे सोशल मीडिया प्रमुख अमित मालवीय यांनी यासंदर्भात ट्विट करताना सोनिया गांधींना स्थलांतरित मजुरांसाठी तिकीट काढणे हे महत्त्वाचे वाटते, पण स्वत:च्या घराचे भाडे भरणे महत्त्वाचे वाटत नाही, असा टोला लगावला आहे.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …