ठळक बातम्या

सैयद मुश्ताक अली फायनल : गतविजेत्या तामिळनाडू व कर्नाटक आमने-सामने

नवी दिल्ली – तामिळनाडू सोमवारी येथे सैयद मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये आपल्या जेतेपदाचा बचाव करण्यासाठी उतरेल, तेव्हा त्यांच्यासमोर आत्मविश्वासात आलेल्या कर्नाटकच्या आव्हानाचा सामना करावा लागेल.

यावर्षीची फायनल २०१९ सैयद मुश्ताक अली फायनलप्रमाणेच होणार आहे, जिथे कर्नाटकने रोमहर्षक सामन्यात तामिळनाडूचा फक्त एका धावेने पराभव केला होता, तर २०२०-२१ च्या सत्रात तामिळनाडूने बडोद्याचा पराभव करत जेतेपद पटकावले होते. तामिळनाडूचा संघ आता सोमवारी अरुण जेटली स्टेडियममध्ये २०१९ फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासह जेतेपदाचा बचाव करू पाहिल, तर कर्नाटकचा संघ तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. यासाठी त्यांचा सलामी फलंदाज रोहन कदमला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या रचावी लागेल, जसे त्याने विदर्भविरुद्धच्या सेमिफायनलमध्ये रचली होती. कदम व कर्णधार मनीष पांडे तामिळनाडूसारख्या बळकट गोलंदाजी आक्रमणाला कमकुवत सिद्ध करत आपल्या संघाची चांगली सुरुवात करू पाहिल. त्यांना आपल्या मधल्या फळीकडूनही अपेक्षा असतील, जिथे खेळाडूंच्या कामगिरीत सातत्य दिसले नाही. करुण नायर अनफॉर्म असून तो चांगली कामगिरी करू पाहिल. फॉर्मात असलेला अभिनव मनोहर, अनिरुद्ध जोश्ी व बी. आर. शरथला पहिल्या फळीच्या मदतीची गरज असेल. दरम्यान, कर्नाटकला आपल्या गोलंदाजी आक्रमणाची जास्त चिंता नसेल, खासकरून त्यांच्याकडे विद्याधर पाटील (आतापर्यंत चार विकेट), वी. व्यशाक (सात विकेट) व एम. बी. दर्शन (सहा विकेट) असा वेगवान गोलंदाजांचा चमू आहे. दरम्यान, हे त्रिकुट जास्त अनुभवी नाही, पण कठीण परिस्थितीत त्यांनी चांगली कामगिरी केली व संघाला फायनलपर्यंत नेले. आता त्यांना तामिळनाडूच्या बळकट फलंदाजी चमूविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी करायची आहे. कर्नाटकला के. गौतम (सात विकेट)ची कमतरता भासेल, ज्याला भारत ‘ए’ संघात निवडण्यात आले आहे. के. सी. करियप्पा (१० विकेट) आणि जे. सुचित (सहा विकेट) ही फिरकी जोडी संघाच्या शक्यतांसाठी महत्त्वाची असेल, कारण त्यांच्या आठ षटकांच्या निकालाने सामन्यावर प्रभाव पडू शकतो.
दुसरीकडे तामिळनाडूचा संघ स्पर्धेत चांगल्या फॉर्मात आहे. संपूर्ण संघाची कामगिरी चांगली राहिली आहे, ज्यात विविध खेळाडूंनी विविध वेळी योगदान दिले आहे, तरी देखील खूप काही एन. जगदिशन (१६३ धावा, एक अर्धशतक) आणि सी हरि निशांत (१७७ धावा) या जोडीच्या सुरुवातीवर अवलंबून असेल. बी. साई सुदर्शन (१७३ धावा)च्या कामगिरीकडेही सर्वांकडे लक्ष असेल. कर्णधार विजय शंकर संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, त्याच्या नावे १८१ धावां (एक अर्धशतक, १४ चौकार व आठ षटकार)ची नोंद आहे. तो आपल्या फलंदाजीच्या जोरावर सामन्याचा निकाल बदलू शकतो. त्याला एम. शाहरूख खानची मदत मिळेल. जर पहिली फळी अपयशी राहिली तर शाहरूखच्या कामगिरीवर सर्व अवलंबून असेल. डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन दुखापतीमुळे मागील दोन सामने खेळू शकला नव्हता, त्याच्या पुनरागमनाची संघाला अपेक्षा असेल. दरम्यान, संदीप वॉरियर व पी. सरवन कुमार यांनी चांगली कामगिरी केली आहे, तर स्पिनर आर. साई किशोर, एम. अश्विन व आर. संजय यादव शानदार राहिलेत, त्यांनी धावगती रोखण्यासह विकेटही मिळवल्या. त्यामुळे हा सामना एकप्रकारे रंगतदार होणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …