सैयद मुश्ताक अली ट्रॉफी : राजस्थानला हरवून विदर्भ सेमी फायनलमध्ये

नवी दिल्ली – गोलंदाजांनी केलेली कमाल आणि त्यानंतर फलंदाजांनी उडवलेली धमाल यांच्या बळावर विदर्भाने गुरुवारी येथे राजस्थानला ९ विके ट्सनी हरवून सैयद मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० क्रिकेट टूर्नामेंटच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. नाणेफेक जिंकू न गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर विदर्भाने आपल्या गोलंदाजांच्या बळावर राजस्थानला २० षटकांमध्ये आठ विकेट्सवर ८४ धावांवर रोखून धरले. नंतर सलामीचा फलंदाज अथर्व तायडेच्या ४२ चेंडूंमधील नाबाद ४० धावांच्या जोरावर ५.१ षटके राखून विजयाला गवसणी घातली.
विदर्भाने १४.५ षटकांमध्ये एका विकेटवर ८७ धावा केल्या. राजस्थानने पहिल्या दोन षटकांतच सलामीचे फलंदाज यश कोठारी (१) आणि अरिजीत गुप्ता (०) यांच्या विकेट गमावली. वेगवान गोलंदाज दर्शन नालकंडे (आठ धावांवर एक विकेट) ने त्यानंतर बाद कर्णधार महिपाल लोमरोर (११) तर युवा वेगवान गोलंदाज यश ठाकू र (२४ धावांवर दोन विकेट) ने दीपक हुड्डा (३) ला तंबूत पाठवून राजस्थानची धावसंख्या चार विकेटवर १८ धावांवर रोखून धरली. विदर्भाच्या गोलंदाजांनी नियमित फरकाने विकेट घेत राजस्थानच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधीच दिली नाही. कमलेश नागरकोटीने ४८ चेंडूंमध्ये ३९ धावांचा डाव खेळत संघाची धावसंख्या ८० च्या पुढे नेण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. विदर्भाच्या बाजूने नालकंडे आणि ठाकूर यांच्या व्यतिरिक्त ललित यादवने १२ धावांत एक तर अक्षय कर्णेवारने चार षटकांमध्ये सात धावा देऊन एक विकेट घेतली. अक्षय वखारेने २१ धावा देऊन तर अथर्वने ९ धावा देऊन एक बळी घेतला. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अथर्व आणि गणेश सतीश (३३ चेंडूंत २८ धावा) ने पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भर घालून विदर्भाला शानदार सुरुवात करून दिली. अथर्व आणि सतीश या दोघांनीही आपल्या डावात चार-चार चौकार लगावले. सतीश ११ व्या षटकात तंबूत परतल्यानंतर अथर्वने कर्णधार अक्षय वाडकर (नाबाद ११)च्या साथीने संघाला लक्ष्यापर्यंत पोहोचवले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …