सैफला करिना मुळीच वाटत नाही हॉट

सैफ अली खान आणि करिना कपूर ही बॉलीवूडच्या सर्वात सुंदर जोडींपैकी एक मानली जाते. सैफचा करिनावर जितका जीव आहे तितकीच करिनाही सैफची दिवानी आहे, परंतु असे असूनही सैफला करिना जराही हॉट वाटत नाही. याचा खुलासा खुद्द सैफने एका व्हिडीओत केला आहे.
सैफ अली खान हा केवळ उत्कृष्ट अभिनेताच नाही, तर एक मस्तमौला व्यक्तीही आहे. जेव्हा सैफ आणि कतरिना कैफ यांचा ‘फँटम’ चित्रपट प्रदर्शित होणार होता, तेव्हा त्याच्या प्रमोशनसाठी हे दोघेही झलक दिखलाजा सीझन ८ च्या सेटवर दाखल झाले होते. त्यावेळी करण जौहर आणि शाहिद कपूर हे जजच्या खुर्चीवर बसले होते. करणने सैफची चेष्टा करताना त्याला विचारणा केली की, तुला कोणती अभिनेत्री सर्वात जास्त हॉट वाटते? त्याकरिता त्याने सैफला कतरिना कैफ, करिना कपूर खान, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि सोनम कपूर हे ऑप्शन्सही दिले. तेव्हा सैफ म्हणाला,’कतरिना खूप प्रोफेशनल आहे. त्या हिशोबाने तो कतरिनाला सर्वात हॉट मानतो. त्यावेळी करण व तेथे बसलेले अन्य स्पर्धक हसू लागले. अगदी शाहिदलाही हसू अनावर झाले. सैफचे उत्तर ऐकून करणने त्याला वारंवार तोच प्रश्न करून भंडावून सोडले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …