बाली – दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू इंडोनेशिया मास्टर्स सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये जपानची अग्रमानांकित अकाने यामागुचीकडून सरळ सेटमध्ये पराभूत झाली. या सामन्याआधी यामागुचीविरुद्ध सिंधूचा रेकॉर्ड १२-७ असा होता व या वर्षी दोन्ही सामन्यात सिंधूने तिचा पराभव केला होता पण शनिवारी ती तिचा सामना करू शकली नाही. हा एकतर्फी सामना ३२ मिनिटांच्या आत १३-२१, ९-२१ असा सिंधूने गमावला. तिसरे मानांकन प्राप्त सिंधू आपल्या सर्वोत्कृष्ट फॉर्मात नव्हती. दोन्ही गेममध्ये ती सुरुवातीपासून पिछाडीवर होती. दुसऱ्या गेममध्ये तिने काही वेळेसाठी आघाडी मिळवली, पण यामागुचीने शानदार पुनरागमन करत तिला कोणतीच संधी दिली नाही. आता जपानची खेळाडू चौथे मानांकन प्राप्त अन् सियंग व थायलंडची पी. चायवान यांच्यातील विजेत्याशी फायनलमध्ये खेळेल. भारताच्या अपेक्षा आता किदांबी श्रीकांतवर टिकलेल्या आहेत, जो पुरुषांच्या सेमी फायनलमध्ये तिसरे मानांकन प्राप्त डेन्मार्कच्या अँडर्स अँटोंसेनविरुद्ध खेळेल.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …