डिस्ने+ हॉटस्टारची ‘आर्या’ २०२०मधील सर्वात लोकप्रिय वेब सीरिज बनली आहे. शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये सुष्मिता सेनच्या क्रूर लूकच्या रोमांचक टीझरने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे! चाहत्यांना आगामी सीझनसाठी त्यांचा उत्साह रोखता येत नाही आणि त्याचवेळी मोशन पोस्टारच्या निमित्ताने सुष्मिता सेनने आर्या-२च्या शूटमधील तिची संस्मरणीय आठवण शेअर केली.
प्रत्येक शूट हा कलाकारासाठी एक संस्मरणीय अनुभव असतो, तरीही काही क्षण असे असतात, जे आयुष्यभराठी संस्मरणीय बनतात. आर्या-२मधील अशाच एका घटनेबद्दल बोलताना सुष्मिता सेन म्हणाली की, ‘जसे जसे आपण पुढे जात आहोत, प्रेक्षकांना मेकिंग आणि प्रोसेसबद्दल सांगण्याच्या या प्रवासात अशा अनेक घटना आहेत; मात्र हा असा एक खास सीन आहे, जो आम्ही जयपूरमधील हेलिपॅडवर शूट केला आहे. हे एक महत्त्वाचे दृश्य होते, २४ मिनिटांचा एक मोठा टेक होता जो एकाच वेळी आणि अनेक व्हेरिएशन्ससह शूट केला गेला होता.
या सीनबद्दल अधिक माहिती देताना सुष्मिताने सांगितले की, ‘सीझन-२साठी हा एक अतिशय महत्त्वाचा सिक्वेन्स होता. तुम्हाला माहीत असेल की, राजस्थानमध्ये ऑफ सीझन पाऊस पडत नाही; मात्र २४ मिनिटांच्या या सीनमध्ये शेवटी प्रचंड गडगडाटासहित पाऊस पडला, फक्त आमच्यासाठी! आम्हाला एक अप्रतिम बॅकड्रॉप स्कोअर मिळाला आणि एनवायरमेंटल साऊंडची आवड असलेल्या आमचे दिग्दर्शक म्हणाले की, हे यापेक्षा चांगले असूच शकत नाही. त्यामुळे, हा सीन आपल्या सर्वांसाठी हाय पॉइंट आहे आणि तो आमच्यासाठी खूप संस्मरणीय आणि खास दिवस ठरला.
सुष्मिता सेनने ‘आर्या’द्वारे तिचे डिजिटल पदार्पण, तसेच अभिनयात पुनरागमन केले आहे. राम माधवानी यांनी या सीरिजद्वारे वेब विश्वात प्रवेश केला, ज्याने याला आणखी खास बनवले आहे. सुष्मिता व्यतिरिक्त, या मालिकेत चंद्रचूर सिंग, नमित दास आणि सिकंदर खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि दुसऱ्या आवृत्तीत आणखी नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत.
One comment
Pingback: ruby disposables cz 457 chassis cz75 kadet cz 457 provarmint cz accushadow ruby gmo cookies ruby goat milk disposable psl rifle for sale köpa stesolid utan recept fidel runtz strain