* सुरेश म्हात्रे पाचव्यांदा पक्षांतर
मुंबई – ठाणे जिल्हा परिषदचे बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राज्याचेउपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. अवघ्या साडेचार महिन्यांपूर्वी म्हात्रेंनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना-काँग्रेस नंतर आता राष्ट्रवादी असा सुरेश म्हात्रेंचा राजकीय प्रवास आहे.
शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख म्हणूनही काम केलं होते. ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते, तर बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती पदही त्यांनी सांभाळले.२०२४ मध्ये सुरेश म्हात्रेंनी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती.पराभवानंतर आधी भाजप, नंतर पुन्हा स्वगृही शिवसेनेत प्रवेश केला होता.केंद्रीय पंचायत राज्यमंत्री खासदार कपिल पाटील यांचेकट्टर राजकीय विरोधक म्हणून सुरेश म्हात्रेपरिचित आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपा युती असतानाही म्हात्रे यांनी मंत्री पाटील यांच्या विरोधात जाहीर बंड पुकारले होते. तेव्हापासून म्हात्रे हे जास्तच चर्चेत होते. मात्र, मागील पाच ते सहा महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नव्हता. मागील काही दिवसांपासून ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते, मात्र गुरुवारी त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केल्याने या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सुरेश म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद निश्चितच वाढणार असून, म्हात्रे यांना राष्ट्रवादी संपूर्ण राजकीय ताकद देईल, असे आश्वासन या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. माझी कोणावरही नाराजी नाही. तसेच कोणासोबतही स्पर्धानाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास आपण पूर्णपणे सार्थ करणार असून, पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणेपार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया सुरेश म्हात्रे यांनी दिली.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …