सुरेश पुजारीला आणखीन एक धक्का

  • मुंबई एटीएसकडून नवीन गुन्हा दाखल

मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि रवी पुजारी यांचा जवळचा हस्तक सुरेश पुजारी विरोधात मुंबई दहशतवादविरोधी पथकाने नवा गुन्हा दाखल केला आहे. एका व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून पुजारीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खंडणी प्रकरणाचा दहशतवादाशी संबंधित अँगल आहे का? याचाही तपास करण्यात येत आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रवी पुजारीला गेल्या वर्षी १५ डिसेंबरला फिलिपाइन्समधून भारतात आणण्यात आले होते. पुजारीला सध्या ११ जानेवारी, २०२२ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून, पुजारीने व्यावसायिकाकडून घेतलेली रक्कम कोणत्या दहशतवादी कारवायांसाठी वापरली आहे का?, याचाही तपास पोलीस करीत आहेत. अलीकडेच मुंबईतील एका व्यावसायिकाने एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला होता. ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरेश पुजारी याने फोन करून १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा त्यांनी केला होता. सुरेश पुजारीला मुंबई एटीएसच्या विक्रोळी युनिटने अटक करून न्यायालयात हजर केले. पुढील तपासासाठी न्यायालयाने त्याला ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर माहितीनुसार, १५ डिसेंबर २०२१ रोजी तो दिल्ली विमानतळावर उतरताच इंटेलिजन्स ब्युरो आणि सीबीआयने त्याला आपल्या ताब्यात घेतले. यानंतर मुंबई एटीएससह अनेक तपास यंत्रणांनी चौकशी करून खंडणी वसूल केल्याच्या आरोपाचा तपास केला. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. २०१७ आणि २०१८ मध्ये मुंबई आणि ठाणे पोलिसांनी सुरेश पुजारीविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. अखेर फिलिपाइन्समध्ये त्याला अटक करण्यात आली. गँगस्टर सुरेश पुजारी हा मुंबई आणि कर्नाटकात खंडणीचा व्यवसाय चालवत होता.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …