ठळक बातम्या

सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण

मुंबई – राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर बुधवारी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पती सदानंद सुळे यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सुळे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही, पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नात त्याचबरोबर निहार ठाकरे आणि अंकिता पाटील यांच्या लग्नातही सुळे यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्या अनेकांच्या संपर्कात आल्या असल्याची शक्यता आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …