सुधांशू सारिया दिग्दर्शित ‘उलझ’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

सर्वात मोठ्या कौटुंबिक कॉमेडी-ड्रामा ‘बधाई हो’ सह बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यानंतर, ‘राझी’, ‘बरेली की बर्फी’ आणि ‘तलवार’ यासारख्या मनोरंजक चित्रपटांसाठी ओळखले जाणारे जंगली पिक्चर्स लि. त्यांच्या आगामी ‘उलझ’ साठी सज्ज झाले असून हा एक उच्च निर्मितीमूल्य असलेला एक गुप्तहेर ड्रामा आहे. हा चित्रपट एक हाय-ऑक्टेन नायिकाप्रधान स्पाय थ्रिलर असून तो प्रेक्षकांसाठी अनेक ट्विस्ट आणि टर्नसह एक दृश्यास्पद पर्वणी असेल, अशी अपेक्षा आहे. स्टुडिओने या चित्रपटासाठी दिग्दर्शक सुधांशू सारिया यांच्याशी सहयोग केला आहे, ज्यांनी नॉक नॉक नॉक (2019) या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. सुधांशूने यापूर्वी समीक्षकांनी प्रशंसित चित्रपट “लव्ह” दिग्दर्शित केला आहे जो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे आणि ते सध्या दिल्ली क्राइमच्या तिसऱ्या सीझनसह दोन मालिकांवर काम करत आहे.
‘क्वीन’ आणि ‘बजरंगी भाईजान’ फेम ज्येष्ठ लेखक परवेझ शेख यांनी लिहिलेली ‘उलझ’ ही अशीच एक स्क्रप्टि आहे ज्याने इंडस्ट्रीत खूप उत्साह आणि अपेक्षा निर्माण केल्या आहेत. हा चित्रपट अनेक महिलाप्रधान स्पाय थ्रिलर्सपैकी एक असेल ज्याचे चित्रीकरण सुंदर आंतरराष्ट्रीय ठिकाणी केले जाणार असून याच्या चित्रीकरणाला 2022 मध्ये सुरूवात होणार आहे. हा चित्रपट एका देशभक्त कुटुंबातील स्त्री नायिकेवर केंद्रित असून तिच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय पोस्टिंगमुळे, घरापासून दूर एका धोकादायक कटात अडकते.
याविषयी सुधांशू सांगतात, ”परिपूर्णता आणि सुपरहिरोजच्या काळात, अपयश आणि सुटकेच्या थीमशी संबंधित कथानकावर मनोरंजक पद्धतीने संवाद साधण्याचे धाडस करणारी स्क्रप्टि असणे आश्चर्यकारक आहे. परवेझने एका अभूतपूर्व स्त्री नायकासह एक उत्कृष्ट थ्रिलरपट लिहिला असून मी तो जगभरातील प्रेक्षकांसाठी पडद्यावर आणण्यास उत्सुक आहे.”

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …