ठळक बातम्या

सुतक असणाºया पुजाºयाने पंतप्रधान मोदींकडून करून घेतली पूजा

काशी विश्वनाथ मंदिर प्रशासनाने सुरू केली चौकशी
नवी दिल्ली – हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबातील व्यक्तींना पुढील १० दिवसांसाठी सुतक असते. या कालावधीमध्ये मृत व्यक्तीच्या घरातील व्यक्ती मंदिरांमध्ये जात नाही, तसेच अनेक ठिकाणी देवाची पूजाही केली जात नाही. मात्र द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाºया श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाºयांपैकी एकाने हा नियम पाळला नसल्याचे समोर येत आहे. १३ डिसेंबर रोजी विश्वनाथ धामच्या लोकार्पण सोहळ्यानंतर गर्भगृहामधील एका पुजाºयाने सुतक असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पूजा केल्याची माहिती समोर आलीय. मंदिराशीसंबंधित पदाधिकाºयांनी यासंदर्भात आक्षेप घेतल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरूकरण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करण्याचा विचार मंदिर प्रशासन करत आहे.

पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असणाºया काशी विश्वनाथ धामचे १३ डिसेंबर रोजी लोकार्पण करण्यात आले. श्रीकांत मिश्रा नावाच्या पुजाºयाने केलेल्या चुकीमुळे सध्या या प्रकल्पाची उत्तर प्रदेशमध्ये चर्चा आहे.
विश्वनाथ धाममधील लोकार्पण सोहळ्यानंतर पुजारी श्रीकांत मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान मोदींनी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहामध्ये पूजा केली, मात्र मिश्रा यांच्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्याने त्यांना सुतक लागले होते, अशी माहिती समोर येते आहे. श्रीकांत यांचा पुतण्या वेद प्रकाश मिश्रा याचा ५ डिसेंबर रोजी रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला. श्रीकांत यांनी काही दिवसांपूर्वीच वेद प्रकाश मिश्रा याच्या तेराव्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका समोर आल्यानंतर सर्व प्रकरण प्रकाश झोतात आले आहे.

घरात सुतक असतानाही पंतप्रधानांच्या हस्ते पूजा करणाºया या पुजाºयाविरोधात आता स्थानिकांनी उघडपणे भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाची सर्वात पाहिली तक्रार श्री काशी विश्वानाथ मंदिर न्याचे माजी सदस्य प्रदीप कुमार बजाज यांनी केली. बजाज यांनी सर्व पुरावे आणि कागदपत्रांसहित पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संबंधित अधिकाºयांना यासंदर्भातील लेखी तक्रार केली.
श्रीकांत यांच्या सख्ख्या पुतण्याचे मध्य प्रदेशमध्ये ५ डिसेंबर रोजी निधन झाले होते. ६ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर दहा दिवस सुतक पाळले जाते. त्यामुळे ६ डिसेंबरपासून दहा दिवस मिश्रा यांना सुतक लागले होते. तरीही त्यांनी १३ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहामध्ये पूजा केली. मिश्रा यांनी ही पूजा करायला नको होती. मिश्रा यांनी सुतक असताना मंदिरामध्येही प्रवेश करायला नको होता असे बजाज म्हणालेत. या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी बजाज यांनी केली आहे.

मंदिर प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. काशी विश्वानाथ मंदिराच्या विशेष कार्याधिकारी उमेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिर प्रशासनाकडे या संदर्भातील तक्रार आली आहे. या प्रकरणामागील सत्य काय आहे, याचा तपास मंदिर प्रशासन आपल्या स्तरावर करत असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. या प्रकरणामध्ये पुजारी मिश्रा यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. यासंदर्भात कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाईचे आश्वासन मंदिर प्रशासनाने दिले आहे.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …