तुमची गर्लफ्रेंड जगातील सर्वात सुंदर महिला नाही, असा तुमचा गैरसमज झाला असेल, तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. जेव्हा तुम्ही स्वत: ही गोष्ट तिला सर्वांसमोर सांगाल, तेव्हा हा त्रास वाढेल. होय, ब्रिटनमधील एका जोडप्यात वाद झाला होता की, प्रेयसी तिच्या प्रियकराच्या नजरेत जगातील सर्वात सुंदर स्त्री आहे की नाही?, प्रियकरानेही जास्त विचार न करता प्रामाणिकपणा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितले की, ती जगातील सर्वात सुंदर स्त्री नाही. मग काय, मैत्रीण केटीला इतका राग आला की, ती तिथून निघून गेली.
प्रेयसीच्या अशा जाण्याने तो दुखावला गेला होता, त्याची चूक काय होती हे त्याला समजत नव्हते. त्याचा संभ्रम दूर करण्यासाठी त्याने रेडिटवर त्याच्या सहकाºयांकडून सूचना मागवल्या. केटी अजूनही संतापली आहे, याचे कारण म्हणजे तिच्या प्रियकराने तिला दिलेली अशी असभ्य कमेंट. तिला फक्त त्याची स्तुती ऐकायची होती पण प्रियकराने असे उत्तर दिले की, तिला तिच्या मैत्रिणींसमोर लाजिरवाणे व्हावे लागले. वास्तविक, दोघांमध्ये हा प्रश्न-उत्तर मित्रांसोबत सुरू असलेल्या पार्टीदरम्यान झाला आणि बॉयफ्रेंडच्या नजरेत जगातील सर्वात सुंदर मुलगी नसल्याबद्दल केटीला सगळ्यांचेच ऐकावे लागले, ज्याच्यासमोर तिने हे विचारले होते. आता लोक रेडिटवर त्यांचे मत देत आहेत. बरेच मित्र त्या मुलाला मूर्ख म्हणत आहेत. मैत्रिणीच्या नाराजीसाठी तिला दोष देत. वास्तविक, युझरने एका साइटच्या माध्यमातून लोकांना विचारले होते की, या संपूर्ण घटनेत दोष कोणाचा आहे, त्याची की गर्लफ्रेंड केटीची? यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी सुचवले की, तुम्हाला फक्त ‘हो’ म्हणायचे आहे, नंतर कधीही कोणतीही तक्रार करू नका, परंतु तुम्ही परीक्षेत नापास झालात. त्याच वेळी, प्रियकर म्हणतो की खरंतर, केटीला स्वत:चा खूप अभिमान आहे. सगळ्यात सुंदर स्त्री असण्याचं उत्तर ऐकल्यावर ती खूप संकोचायची, म्हणूनच मी जे खरं ते बोललो. मिस्टर युझर, तुम्ही तुमच्या मनाची गोष्ट बोलून दाखवली, पण त्याच्या साइड इफेक्टमुळे मैत्रिणीच्या रोषाला सामोरे जावे लागले, त्याचे काय?
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …