नवी दिल्ली – तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेत बुधवारी मृत्युमुखी पडलेले देशाचे पहिले संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवांवर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गुरुवारी सायंकाळी उशिरा रावत पती-पत्नींसह या दुर्घटनेत जीव गमवावा लागलेल्या अन्य बारा अधिकारी-जवानांचे मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानातून तामिळनाडूमधून येथे आणण्यात आले.
रावत पती-पत्नी यांचे मृतदेह त्यांच्या दिल्लीस्थित घरी पोहोचविण्यात आले. शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी दोन वाजेपर्यंत रावत यांच्या दिल्लीस्थित घरात दोघांचे मृतदेह अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर कामराज मार्गावरून ब्रार चौकापर्यंत अंत्ययात्रा निघेल आणि दिल्ली कँटॉन्मेंट येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अन्य अधिकारी-जवानांवरही लष्करी इतमामातच अंत्यसंस्कार केला जाणार आहे.
सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य १२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळी उशिरा तामिळनाडूतून दिल्लीसाठी रवाना करण्यात आले. त्याआधी एका कस्ब्यातून जेव्हा सर्व पार्थिव घेऊन शववाहिका रवाना झाल्या, त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे राहत हजारो लोकांनी पुष्पवृष्टी केली. यावेळी अनेक नागरिक भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अन्य सर्वांचे मृतदेह मद्रास रेजिमेंट सेंटर येथे आणण्यात आले होते.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …