सिद्धार्थच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच शहनाजने शेअर केली पोस्ट

टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या मृत्यूनंतर शहनाज गिल जणू काही कुठेतरी हरवून गेली आहे. शहनाज भलेही शूटिंगवर परतली आहे, परंतु तिच्या चेहऱ्यावरची उदासी स्पष्टपणे दिसून येते. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर तर ती पूर्णपणे गायबच झाली होती. ती ना सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होती आणि ना कुठे बाहेर दिसून येत होती. खरेतर आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखांच्या आसपास ती पुन्हा कामावर परतलीयं. त्याचबरोबर ती आता सोशल मीडियावरही ॲक्टिव्ह झाली आहे.

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर ५७ दिवसांनी पहिल्यांदाच आपल्या इंस्टाग्रामवर पहिली पोस्ट शेअर करत शुक्रवारी रिलीज झालेल्या आपल्या एका गाण्याची आगाऊ माहिती दिली. हे गाणे शहनाजने सिद्धार्थला समर्पित केले असून गाण्याचे बोल आहेत, ‘तू यहीं है’. शहनाजने
इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात सिड आणि ती मोकळेपणाने हसताना दिसत आहे. पोस्टरवर लिहिले आहे,’तु यहीं हैं… सिद्धार्थ शुक्लाला माझे ट्रीब्युट’ हा फोटो शेअर करत शहनाजने पुन्हा एकदा आपले प्रेम व्यक्त केले आहे, तिने लिहिले आहे,’तू मेरा है और…’ सिद्धार्थ शुक्ला.’

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …