ठळक बातम्या

सिंधू बीडब्ल्यूएफ खेळाडू आयोगाच्या सदस्यपदी

नवी दिल्ली – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला बॅडमिंटन विश्व महासंघा(बीडब्ल्यूएफ)ने खेळाडू आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त केले. २६ वर्षीय माजी विश्व चॅम्पियन सिंधूला पाच इतर खेळाडूंसोबत सदस्य नियुक्त करण्यात आले, ज्यांचा कार्यकाळ २०२५ पर्यंत असेल. बीडब्ल्यूएफने दिलेल्या वक्तव्यानुसार, बीडब्ल्यूएफला खेळाडू आयोग २०२१-२०२५ च्या सहा सदस्यांची घोषणा करताना आनंद होत आहे. आयरिस वँग (अमेरिका), रॉबिन टेबलिंग (नेदरलँड), ग्रॅसिया पोली (इंडोनेशिया), किम सोयोंग (कोरिया), पी. व्ही. सिंधू (भारत) व झेंह सी वेई (चीन) यांचा यात समावेश आहे. हे सहा सदस्य आता अध्यक्ष व उपाध्यक्षांचा निर्णय घेतील. बीडब्ल्यूएफ म्हणाले की, नवे आयोग लवकरच बैठक घेईल व या सहा सदस्यांमधील अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड करण्यात येईल. बीडब्ल्यूएफ खेळाडू आयोगाचा अध्यक्ष २०२५ मध्ये होणाऱ्या पुढील निवडणुकापर्यंत परिषदेचा सदस्य असेल. रियो ऑलिम्पिक २०१६ मधील रौप्य पदक विजेत्या सिंधूने यावर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकत इतिहास रचेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment

  1. Pingback: health tests