सिंधू क्वार्टर फायनलमध्ये, सात्विक-चिराग देखील विजयी

पॅरिस – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेता पी. व्ही. सिंधूने येथे महिला एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात डेन्मार्क च्या लाइन क्रिस्टोफरसनचा सरळ सेटमध्ये पराभव करत फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. तिसरे मानांकन प्राप्त सिंधूने गुरुवारी रात्री खेळवल्या गेलेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत २४ व्या स्थानी काबिज क्रिस्टोफरसनचा २१-१९, २१-९ असा पराभव केला. हा सामना ३७ मिनिटापर्यंत चालला. सध्याची विश्व चॅम्पियन सिंधू क्वार्टर फायनलमध्ये थायलंडच्या आठवे मानांकन प्राप्त बुसानन ओंगबामरुंगफानविरुद्ध भिडेल. तिने मागील आठवड्यात डेन्मार्क ओपनमध्ये बुसाननचा पराभव केला होता. सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टीच्या पाचवे मानांकन प्राप्त दुहेरी जोडीने देखील आपल्याच देशातील एम. आर. अर्जुन व ध्रुव कपिलाचा १५-२१, २१-१०, २१-१९ ने पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. ही भारतीय जोडी आता ॲरोन चिया व सोह वूई यिकच्या चौथे मानांकन प्राप्त मलेशियन जोडीशी होईल. पुरुष एकेरीत सौरभ वर्मा दरम्यान दुसऱ्या फेरीत जपानच्या कँटा निशिमोतोशी १२-२१, ९-२१ असे पराभूत होत स्पर्धेबाहेर झाले. युवा लक्ष्य सेन गुरुवारी सिंगापूरच्या लोह कीन यूवर सहजपणे विजय मिळवत तिसऱ्या फेरीत पोहचला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …